मै भारतीय हुं इसकी मुझे शर्म आती है...इति भावी पंतप्रधान .. ईट का जबाब पत्थर से देंगे...महाराज्य के गृहमंत्री... मुझे इंडियन लोकशाही की शर्म आती है.... और उसे पत्थर से मार देना चाहता हुं . आपको किस बात की शर्म आती है , और आप किसे पत्थर से मारना चाहते है.याचा विचार करत असतना लाज, शर्म, गर्व , माज, अभिमान अश्या अनेक भावना वर भारताचे राजकारण चालते याचा प्रत्यय आला. सरड्याच्या रंगा प्रमाणे यांच्या भावना बदलत असतात. उत्तर प्रदेशात जबरदस्तीने जमीन अधिग्रहण होत असल्या मुळे यांना लाज वाटते , रस्त्यावर तमाशा नौटंकी करण्याची लाज वाटत नाही . तर दुसरी कडे जैतपूर मध्ये भारताच्या कृत्रिम मानव निर्मित वीज टंचाई चे निमित्त करत ह्यांचाच पक्ष शेतकऱ्यांच्या जमिनी बंदुकीच्या बळावर अधिग्रहण करत आहे याची लाज वाटत नाही . हा आपल्या राजकारण्यांचा मुखवटा आहे.
यांना के राजा,कलमाडी, कानमोझी, दीक्षित या भ्रष्ट्र भुतावळी ची लाज वाटत नाही, देशातील नागरीक यांच्या चुकीच्या धोरणा मुळे आत्महत्या करत आहेत याची यांना लाज वाटत नाही. तर साडे तीन टक्क्यांच्या भ्रष्ट्र श्रीमंतांचा यांना अभिमान वाटतो. देशातील विषमतेची यांना लाज वाटत नाही. जनतेच्या भावना भडकावून सत्ता हाडपण्याची यांना लाज वाटत नाही. टाग्गेगिरीचा यांना लाज नाही तर गर्व माज आहे. मतदानात मत विकत घेण्याची लाज वाटत नाही.आणि मतदारांना सुद्धा मत विकण्याची स्वत:स विकण्याची लाज वाटत नाही. निवडणुकीत TV , साड्या, पैसा , बाई, बाटली व इतर आमिष मतदारांना देण्यास यांना लाज वाटत नाही, आणि निवडणूक आयोगाला सुद्धा याची लाज वाटत नाही. पेड न्यूज देवून मतदान प्रचार करण्याची सुद्धा लाज वाटत नाही. "आदर्श" नावाला काळीमा फासण्याची शरम वाटत नाही. भूदान ते भूखंड हडप करण्याच्या विकृतीची यांना लाज वाटत नाही.
रात्र दीवस महात्म्याचे नाव घेवून त्याच्याच चिन्हाच्या हत्तीछाप नोटा घेण्यास भ्रष्ट्र कारभार करण्यास लाज वाटत नाही. ग्रामीण जनते ने निवडून दिल्यावर भ्रष्ट्र उद्योगपतीच्या चरणी देश गहाण ठेवण्यास लाज वाटत नाही , उलट विकासाचे खोटे ढोल पिटण्यास यांना गर्व, माज वाटतो. महात्म्याच्या दारूबंदीचा ढोल पिटत देशात दारूचा महापूर आणण्यासाठी दारूचा महापूर आणण्याचे धोरण आखताना , गरिबांना खाण्यास अन्न मिळत नसताना; नेत्यांना अन्नधान्य पासून स्वतः चे दारूचे कारखाने काढण्यास महात्म्याच्या आत्म्याची सुद्धा लाज वाटत नाही. अहिंसेचा जप करत देशात धर्म,जात, भाषा , प्रांत या वरून हिंसाचाराचा आगडोंब निर्माण करताना देशाची नाही तर मनाची ही लाज वाटत नाही. मुह मे राम और बगल मे मत की छुरी, सर्वधर्म समभाव म्हणत देशात दंगल घडवण्याची लाज तर वाटतच नाही तर उलट गर्व माज वाटतो. या दंगली करणाऱ्या बाहुबलीना, गुंडांना, दादा लोकांना प्रतिष्ठा देवून पक्ष तर्फे निवडून आणण्याची यांना लाज वाटत नाही. विरोधी पक्षाचा एखादा चांगला उमेदवार पाडण्यासाठी फालतू सिनेनटला त्याच्या विरुद्ध निवडून आणण्याची यांना तर लाज वाटतच नाही तर अश्या फालतू, बिनकामाच्या उमेदवाराला मत देण्यास मतदाराला सुद्धा लाज शरम वाटत नाही. पेट्रोल ची भाववाढ करताना निवडणूकीच राजकारण करण्याची यांना लाज वाटत नाही.
2 comments:
काँग्रेसचे तथाकथित बुद्धिमान युवराज राहुल गांधी यांचे हिंदुस्थानाबद्दलचे भौगोलिक ज्ञान अत्यंत अल्प असावे ....जैतापुर त्यांच्या माहितीप्रमाणे बहुदा अफगाणिस्तानात असावे....आणि त्यांचे मनोरुग्ण गुरु दिगविजय यांनी देखिल त्यांच्या अगाध ज्ञानात भर घातलेली दिसत नाही........यांना यांच्या पक्षाच्या शासनकालात झालेल्या घोटाळ्यांची,यांच्याच पक्षाच्या खासदारांनी कॉमनवेल्थ खेळांच्या निमित्ताने केलेल्या भ्रष्टाचाराने जगापुढे हिंद्स्थानला मान खाली घालायला लावल्याची,लादेनच्या मृत्युचे भांडवल करत अल्पसंख्यांकच्या मतांसाठी लादेनचा जी म्हणून उल्लेख करणार्या दिग्विजयसिंग यांच्या लोचटपणाची ,२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस जिथे सैनिक आपले प्राण तळहातावर घेऊन लढत होते तेंव्हा स्वतः मेहरोली येथे एका पार्टीचा आनंद घेत होतो याची लाज वाटली नाही......राहुलबाबा आंम्हाला मात्र तुमची,तुमच्या पुज्य मातोश्रींची तुमच्या लुटारु, साठमारी करणार्या पक्षाची,व नालायक व निर्लज्ज काँग्रेसनेत्यांची नक्कीच लाज वाटते........तुंम्हाला तोंड लपवायला तुमच्या मातोश्रींचा देश ईटली पर्याय म्हणून उपलब्ध आहे पण आंम्हा हिंद्स्थानातील जनतेच्या नशिबात असे पर्याय नाहीत....तुंम्हास इतकीच लाज वाटते तर स्वतःचे या देशातले चंबुगबाळे आवरा आणि तुमच्या मातोश्री व समस्त नेतेगण यांना घेऊन या देशातून चालते व्हा..म्हणजे या देशातील तमाम स्वाभिमानी जनता सुटकेचा नि:श्वास टाकायला मोकळी....बोला कधी जाताय?असेच यांना विचारायला हवे?
आपल्या शेतीप्रधान देशात.. शेतकरी म्हणून जन्माला येणे, हे सगळ्यात मोठ्ठे महापाप झाले आहे.
Post a Comment