रॉबर्ट
वडेरा हे भारतीय उद्योजक आहेत. मात्र, उद्योजकाऐवजी त्यांना प्रियंका
गांधींचे पती आणि सोनिया गांधींचे जावई म्हणूनच जास्त ओळखले जाते. रॉबर्ट वडेरा देशाचे भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांपेक्षाही मोठे
असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण ज्या लोकांना देशांतर्गत विमानतळावर
तपासणीतून जावे लागत नाही, अशा लोकांच्या यादीत रॉबर्ट यांच्या नावाचा
समावेश आहे. 28
सप्टेंबर 2005 रोजी रॉबर्ट यांचे नाव या यादीत आले होते. ब्युरो ऑफ सिव्हिल
एव्हिएशन सेक्युरिटीने देशभरात एक पत्रक काढले होते. रॉबर्ट वडेरा जेव्हा
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह प्रवास करतील तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येऊ
नये, असे या पत्रकात म्हटले होते. देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलाच्या
प्रमुखांनाही तपासणीतून जावे लागते, मग रॉबर्ट वडेरांना ही सूट कशासाठी असा
प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका
केली.
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!
No comments:
Post a Comment