Translate

Saturday, October 1, 2011

.....पण आजच्या स्पर्धेच्या वेगवान टू मिनटस जमान्यात हे असले चोचले पुरविणे शक्य नाही.

घरातील आज्जी आई, बहीण,  घर धनीण  अश्या प्रकारे धगधगत्या लाकडाच्या  चुल्हीवर धुराच्या आसमंतात भाकऱ्या थापत असते आणि समोर बसलेल्या घरातील माणसाना चुल्ही  वरून सरळ  ताटात  वाढत असते ते कुटुंब जगातील सर्वात सुखी श्रीमंत अशी माझी जगातील सर्वात सुखी कुटुंबाची  व्याख्या आहे. स्त्री मुक्तीवाद्याची क्षमा मागून.
घरातील भाकर-पोळी  आणि हॉटेल मध्ये मिळणाऱ्या तंदूर रोट्या यात जमीन आस्मान चा फरक असतो. घरातील भाकर-पोळी गरमागरम खा कींवा दोन दिवसांची शिळी झालेली खा ती चविष्ठच लागेल. कारण त्यात घरातील करणाऱ्या स्त्रीचे प्रेम माया आपुलकी मिसळलेली असते. तर धंदेवाईक हॉटेल मधील तंदूर नान पाच मिनटात थंड झाली की ती रबरा सारखी वातड लागून खावी सुद्धा वाटणार नाही.......
गरमागरम भाकर , दगडी वरवंट्यावर ओबोड धोबड वाटलेला हिरव्या मिरच्याचा अद्रक लसून घालून केलेला कच्चा खर्डा. गावरान घाण्यावर फिल्टर न लावता काढलेले करडीचे  तेल. हे जेवण पंच सप्त तारांकित हॉटेलच्या पदार्था पेक्षा ही चविष्ट, रुचकर आणि आरोग्याला हितकारक असते.
भाकर गरम असो कींवा शिळी ट्या बरोबर झणझणीत कोरड्यास पिठलं असेल तर श्रीखंड-पुरी सुद्धा त्या समोर फिक्की पडेल. ........ पण आजच्या स्पर्धेच्या वेगवान टू मिनटस जमान्यात हे असले चोचले पुरविणे शक्य नाही. ..... काळा बरोबर बदलत जाणे हाच यावर उपाय.

No comments: