Translate

Thursday, October 6, 2011

पंजाब मधून प्रसिद्ध होणारे पंजाब केसरी.......

आजच्या बाजारीकरणाच्या युगात प्रत्येक गोष्टीला विक्री मूल्य भाव आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील वर्तमान पत्राचे स्वतंत्र निर्भीड वाचकांचे हीत पाहणारे असे जे स्वरूप होते त्यात सुद्धा झपाट्याने बदल झाला. आज आपण जे वर्तमान पत्र वाचतो त्याच्या पहिल्या पानावरील मुख्य बातमी पासून ते संपादकीय, विविध लेख, नेत्यांच्या राजकारणाच्या बातम्या ते शेवटच्या पानावरील खेळ बातम्या एव्हढेच काय आंदोलनाच्या जनतेच्या हिताच्या अहिताच्या बातम्या सुद्धा पेड न्यूजच असतात. त्याच बरोबर वर्तमान पत्राचे मालक हे भांडवलदार असल्या मुळे सर्वच गोष्टी  पैश्यात मोजल्या जातात. संपादक वार्ताहर हे पगारी नौकर असल्या......................



मुळे येथे विचार स्वातंत्र्याचा प्रश्नच निर्माण होत नाही... आणि कोणी विचार स्वातंत्र्य उपभोगण्याचा चुकून जरी विचार केला तर लगेच लाथ मारून हाकलून दीले जाते, या मुळे पत्रकार वार्ताहर  ही फक्त पाट्या टाकण्याचेच काम करतात. हे एक प्रकारचे  बैठ बिगारी कामगाराच असे झाले आहेत .
या सर्वात पंजाब मधून प्रसिद्ध होणारे पंजाब केसरी हे हिंदी वर्तमान पत्र मात्र आपल्या वेगळ्यापणा मुळे लक्षात राहते. कॉंग्रेस च्या कृपेने ८० च्या दशकात भिंदरवाला नामक भस्मासुराच्या दहशद वाद्याच्या टोळ्यांनी पंजाबात मोठ्या प्रमाणात दहशदवाद माजवला होता. आणि भारतात सर्वात प्रगतीशील असलेले हे राज्य कित्येक वर्ष मागे फेकले गेले. अखेर परीस्थिती हाताबाहेर गेल्यावर भारतीय सैन्याची मदत घेत आणि सुवर्ण मंदीरावर सैनिक कार्यवाई करत भिंदरवाल्याचा त्याच्या साथीदारांचा खातमा केल्यावरच हा दहशदवाद संपला. पण पुढे इंदिरा गांधी आणि जनरल वैद्य या ऑपरेशन ब्लू स्टार प्रमुख यांची ही आहुती या दहशतवादा आगीत पडली. स्वतःच उभ्या केलेल्या भस्मासुराला मारण्याची आणि इंदिरा गांधीच्या खुनाचा सुद्धा गैरवापर कॉंग्रेस आज पर्यंत स्वार्था करता  करत आली.
या दहशदवादा चा प्रखर विरोध पंजाब मधील हिंद समाचार ग्रुप ने केला. या समूहाच्या प्रमुख लाल जगत नारायण या देशभक्ता सह या ग्रुप चे संपादक, वार्ताहर, विक्रते , पेपर विकणारे लहान हाकर्स, गाडीचे वाहन चालक असे एकूण ६३ जण या दहशदवादात मारले गेले. एकीकडे दहशद्वाद्यांच्या अतिरेकी कार्यवाई चे संकट  त्याच बरोबर सत्य निर्भीड पणे मांडत सरकारच्या चुका दाखवण्याचे धाडस करत असल्या मुळे शासनाच्या क्रोधाला ही या ग्रुपला बळी पडावे लागले.  १९७४ मध्ये सरकाने या ग्रुपची वीज आकसाने काटली पण रडत न बसता ट्रक्टर चा वापर करत त्याद्वारे वीज निर्माण करून वर्तमानपत्र प्रकाशित केले ते ही एक दीवस नाही तर १० दीवस अश्या प्रकारे पेपर ट्रक्टर च्या साह्याने प्रकाशित केला. अखेर सरकार नमले आणि वीज चालू केली. पण या परिवाराने हाती घेतलेले देशसेवेचे सतीचे वाण कांही सोडले नाही.
पंजाबातील अंतकवाद्याच्या गोळीला बळी पडलेल्यांच्या परिवारास तसेच शासनाच्या अत्याचारास बळी गेलेल्या परिवारास मदत करण्याचा संकल्प या हिंद परिवाराने २६/११/१९८३ साली सुरु केला .तेंव्हा पासून आज  पर्यंत हा देश सेवेचा यज्ञ अव्याहत पणे चालू आहे. आज तारखे पर्यंत ९०६३ कुटुंबियांना रुपये १२,३८,४०,७८७.०० चे वाटप करण्यात आले.  http://www.punjabkesari.in/punjab/fullstory/28353080_150437-   
लग्न, वाढदिवस , धार्मिक कार्य, मरणोपरांत दानधर्म , वर्ष श्राद्ध अश्या अनेक प्रसंगी पंजाबातील सर्व धर्माची जनता या दान कार्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करत असतात. या दानयज्ञा चा चोख हिशोब रोजच्या रोज वर्तमानपत्रात जाहीर केला जातो. या शिवाय या ग्रुपने स्वतःह वेळोवेळी ४० कोटी हुन जास्त रक्कम विविध आपत्ती निवारणार्थ देलेली आहे. सतत २८ वर्षे ...दोन तपे हे काम निरपेक्ष भावनेने करणे हा वर्तमान जगतातला एक विक्रमच म्हणावा लागेल. कारगिलच्या हुतात्म्यांच्या टाळू वरचे लोणी खाणारे महाराष्ट्रातील फंड पाहीले तर या कार्याचे महत्व ठळकपणे जाणवते.

http://shaheedparivar.com/members.aspx 
http://shaheedparivar.com/default.aspx
http://www.allaboutnewspapers.com/oct08/story7.htm

मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही ! 
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

No comments: