Translate

Saturday, October 8, 2011

पंचाताराकीत हॉटेल मध्ये २ महीने वास्तव करून देखील हे जोडपे आत्महत्या करण्यास जीवन संपवण्यास का प्रवृत्त होते ?

पणजी - एक आयटीत काम करणारं तरुण जोडपं. दोघांना गलेलठ्ठ पगार. दोघांनी बक्कळ पैसा कमावला. खूप खूप एन्जॉय केलं. सारं जग पालथं पाडलं. पण आता काय...? हा प्रश्‍न त्यांना पडला. शेवटी त्यांनी मृत्यूही हसत हसत स्वीकारला. त्यातही समाधान शोधलं.
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकऱ्याचे ! ग. दि. माडगूळकर या आधुनिक वाल्मिकी यांनी आयुष्याचे सार या दोन ओळीत सांगितले. दु:ख अनावर झाले की माणसाला हसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते. तस झाल. आनंदाचा मुखवटा चेहऱ्यावर लावून सुखी असल्याचा आव आणता येतो पण सुख मनापासून उपभोगता येत नाही, नुसता देखावा असतो आणि एका वेळ अशी येते की हा देखावा करण ही अवघड होऊन बसत हे सार सहन होत नाही आयुष्यात पोकळी निर्माण होते, समोर सर्व सुखे हात जोडून उभी असतात पण ती उपभोगण्याची इच्छाच होत नाही. या अनिच्छेने मग ही सर्व सुखे एखाद्या जादूगाराच्या मायाजाला प्रमाणे भासतात . जादू खतम मायाजाल खतम, या उक्ती प्रमाणे जीवनाचा निरथकपणा समोर येतो आणि मग अश्या शोकांतिका घडतात. 
या शोकांतिकास आजचे गतिमान स्वयंकेंद्रित जीवनशैली कारणीभूत आहे. एक तीळ सात जणात वाटून खावा अशी संस्कृती , सुख दुख: सुद्धा वाटली जातात .दुख:इतरांना सांगितले तर कमी होते तर सुख इतरात वाटले तर वाढते म्हणतात पण आज बंद दरवाज्याच्या संस्कृतीत माणसाचे एकाकीपण वाढत आहे आणि हेच एकाकीपण मग जीवाच्या मुळावर येते. पंचाताराकीत हॉटेल मध्ये २ महीने वास्तव करून देखील हे जोडपे आत्महत्या करण्यास जीवन संपवण्यास का प्रवृत्त होते ? हे एक कोडेच आहे.
http://www.esakal.com/esakal/20111008/4909221233719310182.htm
http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/10275156.cmshttp:
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

No comments: