लंडन मध्ये दाउद इब्राहिमच्या साथीदाराला इकबाल मिर्ची ला एका
व्यापाऱ्याला धमकी देण्याच्या प्रकरणा वरून अटक झाली..... त्या इकबाल मिर्चीचे
चुकलेच. लंडन मध्ये धमकी प्रकरणावरून अटक करून घेण्या पेक्षा त्या मुर्खाने
इंडियात आरामशीर राहून ५-२५ व्यापारयांचे मुडदे पाडले असते , दिवसा ढवळ्या खून केले
असते तरी त्याचा या धर्मनिरपेक्ष देशात बाल सुद्धा बाका झाला नसता. आणि
चुकून पकडल्या गेला असता तर मायबाप राजकरणी नेते, मानवाधिकारी शबाना भट्ट
कंपनीनी त्यास सोडवले असते. आणि अखेर शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण
गुन्हेगाराला त्याचा बचाव करण्याचा अधिकार आहे म्हणत न्याय देवते ने त्याला बचावाची संधी दीली
असती...........विविध राज्य सरकारांनी इक्बाल मिरचीला सजा झाली तर राज्यात रक्ताच्या नद्या वाहतील कायदा सुव्यवस्था कोलमडून पडेल म्हणत विधिमंडळात त्याला सजा करू नये म्हणून ठराव पास केले असते.......... नौकरशाही आणि नेते वर्गाने त्याच्या फाईली गायब केल्या असत्या ......... आणि अखेर दया सागर राष्ट्रपती यांनी त्यांना घटने प्रमाणे मिळालेल्या अधिकाराचा वापर करत सजा माफ केली असती. आणि तो सुखाने आलिशान जीवन जगात जगातील सर्वात सुरक्षित तिहार तुरुंगात आपला खंडणी वसुलीचा धंदा करत राहिला असता
No comments:
Post a Comment