आजच्या बाजारीकरणाच्या युगात राष्ट्रीय नेत्यांचे वाढदिवसां चे ही
बाजारीकरण झाले आहे. आज महात्मा गांधी आणि पाकिस्थानला युद्धाच्या
रणांगणात धूळ चारणाऱ्या जयजवान जय किसान चा नारा देत भारताची प्रतिमा
उंचावणाऱ्या साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांचा
ही आज वाढदिवस आहे. पण आजच्या मतांच्या बाजारात यांच्या विचारसरणी किमत 0
शून्य असल्या मुळे त्यांची आठवण कोणत्या ही पक्षाला मिडिया सम्राटाना
झालेली दीसत नाही. भारतात फक्त आणि फक्त गांधीजी आणि नेहरू घराणेच त्यागमय
असल्याचे आणि देशाचे भाग्यविधाता असल्याचे मायाजाल पसरवत स्वतःह चा स्वार्थ
साधत देश विनाशाच्या संकटात लोटल्या जात आहे.
अत्यंत साधे राहणीमान व प्रखर देशाभिमान, भारताचे पंतप्रधान म्हणून घेतलेले
लोककल्याणकारी निर्णय, यामुळे लालबहादूर शास्त्रींविषयी प्रत्येक
भारतीयाला अभिमान आहे जेमतेम दीड वर्ष पंतप्रधानपदवर राहिलेला पण देशाच्याच नव्हे, तर जगाच्या
इतिहासात अजरामर झालेला पंतप्रधान म्हणूनच लालबहादूरांची आठवण राहिली आहे.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आयुबखान हे धिप्पाड आणि उंच होते तर लालबहादूर
शास्त्री उंचीने लहान होते. आयुबखान यांनी त्यांना त्यांच्या उंची वरून
छेडले असता शास्त्रीजींनी ताडकन मूँहतोड उत्तर
दीले. मै आपसे सिर उंचा करके बात कर सकता हुं, मगर आपको मेरे साथ बात करते
वक्त मेरे सामने सर झुकाकार बात करनी पडेगी ध्यान मे रखो . याला म्हणतात
हजरजबाबी पणा.
आघाडीवरचा जवान आणि शेतामधला किसान हेच भारताचे खरे भाग्यविधाते आहेत, हे
शास्त्रींनी ओळखले होते. त्यांच्या हातात नवसमाज घडविण्याची ताकद आहे हे
शास्त्री जाणून होते. त्यांच्या या विचारांची आज भारताला अधिकच गरज आहे.
No comments:
Post a Comment