पावसाळा संपला नाही तरी .... ..... आताच शहरात आठ घंटे वीज कपात सुरु झाली
आहे आणि खेड्यात तर मनमोहन भरोसे वीज कधी येईल कधी जाईल याची शाश्वती ....... तरी पण
भारत जगातील महाशक्ती असल्याचे गाजर दाखवत जनतेला मूर्खाच्या नंदनवनात
फिरवत आहेत. अति झाले आणि हसू आले अशी आपली गत झाली आहे. आता आपल्या नशीबी
ह्याहूनही अधीक घोर भोग आहेत ते भोगलेच पाहिजे . या विजें शिवाय भारत
महासत्ता कसा होणार हे मनमोहन चिदंबरम मुखर्जी आणि मोन्तेक्सिंगच जाणे.
पाणी आणि विजें अभावी मोठ्या शहरातील वधुपिते आता तर मराठवाड्यात मुली
देण्यास तय्यार नाही. याचे वाईट सामाजिक परिणाम लहान शहरावर होतील . ही
छोटी गावे उध्वस्त तर होतीलच, पण त्याच बरोबर नियोजन शून्यरीत्या शहरे
विकसित होत असल्यामुळे शहरी जीवन ही धोकादायक बनेल. गाढवावर बसलेल्या शैख
चिल्ली सारखी आपल्या मनमोहन सरकारची अवस्था झाली आहे. विकासाच्या दिशेने
जाणारे गाढव भारताला कोठे घेऊन जाईल हे मात्र त्या गाढवावर स्वार झालेल्या
स्वारास माहित नाही.
No comments:
Post a Comment