Translate

Sunday, July 31, 2011

या अस्तनी तील दहा तोंडानी लाच खाणाऱ्या सापां चे काय???

चारीत्र्य संपन्न , ध्येयवादी राष्ट्रवादी नैतिकता वादी party with diffrance चा तोरा मिरवणाऱ्या  पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी पक्ष शिस्त पाळत राजीनामा दिला. आमचा पक्ष भ्रष्ट्राचार्याची गय करत नाही सांगत विरोधी पक्षावर टीका करण्यास पक्ष सज्ज. उद्या दिल्हीच्या संसद  अधिवेशनात गोंधळ घालण्यास तय्यार.... पण फक्त राजीनामा देऊन प्रश्न मिटणार आहे का? ...ज्याच्या हाती तिजोरीच्या चाव्या तोच जर चोऱ्या करू लागला तर भारतीय कायद्या प्रमाणे कोणती शिक्षा आहे? याचा कोणी तज्ञ वकील, पक्षाचे प्रव्रक्ते खुलासा करतील  काय?  माझ्या अल्प ज्ञाना प्रमाणे  अश्या चोराला तुरुंगवास याच्या शिवाय दुसरी कोणती ही शिक्षा नाही. आज राजे असते तर त्यांनी या चोराला हत्तीच्या पाया खाली चिरडून ठार करण्याची कींवा गडा वरून खाली खोल दरीत गळ्यात दगड बांधून ढकलून ठार मारण्याची आज्ञा कठोरपणे दीली असती. आता लोकपालानी पुराव्या सहीत आरोप केलेले असताना या येडियुरप्पांचा जेल च्या अंधार कोठडीत कसाब बरोबर  भारतीय सरकार सुद्धा का टाकत नाही?  का? आतून तमाशा वरतून कीर्तन असा प्रकार आहे. एक वेळ हे दहशदवादी बरे कारण यांच्या विरुद्ध कार्यवाई तरी करता येते. पण या अस्तनी तील दहा तोंडानी लाच खाणाऱ्या  सापां चे काय???  यामुळे लोकपालाला शिक्षा करण्याच्या अधिकाराला हे चोर राज्यकर्ते विरोध करत आहे. कारण एकदा इंडिया च्या न्यायालयात खटला दाखल केला की जामिन घेऊन परत सत्तेवर येता येते आणि खटला वर्ष नु वर्ष प्रलंबित ठेऊन शिक्षा न झाल्याच्या आरोप सिध्द न झाल्याचा पळवाटी चा गैरफायदा घेत शासनाच्या सर्वौच्च पदी विराजमान होता येते. जय हो जय हो जय हो!!!!!!  रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा....

No comments: