केंद्रातील काँग्रेस शासनाचा हिंदुद्वेष !विजयनगर
साम्राज्याला ५०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने राजा कृष्णदेवराय यांचे
चित्र असणारे नाणे प्रकाशित करावे,अशी मागणी करण्यात आली होती. त्याला
केंद्रातील काँग्रेस शासनाने नकार दिला.(खिस्ती संतांचे नाणे बनवणार्या
हिंदुद्वेषी काँग्रेस शासनाला हिंदूंच्या राजाचे वावडेच असणार यात नवल ते
काय !) एप्रिल महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री
बी.एस्. येडियुरप्पा यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून
वरील प्रकारची मागणी केली होती. मुखर्जी
यांनी येडियुरप्पा यांना पाठवलेल्या उत्तरादाखल पत्रात म्हटले आहे की,
सध्या देशात नाण्यांचा तुटवडा भासत आहे, याची आपणास माहिती आहेच. ती पूर्ण
करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याकडेच आमचे आणि रिझर्व्ह बँकेचे
सध्या लक्ष आहे. यामुळे तुमची मागणी मान्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत.
बरोबर आहे HER MASTER'S VOICE .... प्रणव मुखर्जी याचं. कोण हे राजा
कृष्णदेवराय . भारतात लोकशाही आहे. मुखर्जीच्या मैडम च्या सासूबाईनी
भारतातील सर्वच राजे संस्थानिक खालसा केले आणि नवीन शैक्षणिक, सहकार, मद्द
, वाळू , भेसळ, बाहुबली निष्टावान जी हुजरे सुभेदार निर्माण केले
आहेत. ते आपल्या मैडम ला खुष करण्यासाठी जे नाव सुचवतील त्यांचेच नावाने
नाणी काढली जातील. भारतातील स्थळांना नावे दीली जातात. पवारांनी पहा बर
महाराष्टाचा सर्व गर्व अभिमान विसरून सागरी सेतूला राजीव गांधी यांचे नाव
सुचवले आणि मैडम नी त्यांच्या सरकारने ते त्वरित मंजूर सुद्धा केले. आता
युवराजच्या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नाणे काढण्याची विनंती
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी करावी . उगीच भूत काळातील
पराक्रमी हिंदू राजांच्या नावाने नाणी काढण्या ची मागणी करून भारतातील
सर्वधर्म समभाव या आतून तमाशा वरून कीर्तन या धोरणास सुरुंग लावू नये. उलट
त्यांनी कर्नाटका मधील कृष्णदेवराय यांच्या नावाने असलेल्या स्थळांना
नेहरू घराण्याच्या भावी वारसाचे राहुल चे नाव देण्याची मागणी करून आपले
आसन पवारा प्रमाणे घट्ट करावे.
No comments:
Post a Comment