मुंबईत अधिवेशन सुरु होण्याचा आधि मुख्यमंत्री यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी नेहमी प्रमाणे बहिष्कार घातला. विरोधकांचा चहापानावर बहिष्कार याचे कारण OFF THE RECORD तुम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणार आदर्श इमले उभे करणार आणि आमची फक्त चहापानावर बोळवण करणार. हे चालणार नाही . आमची ही कांही इज्जत आहे की नाही . नुसत्या चहापाण्यावर आम्ही आमची नैतिकता आत्मा गहाण टाकणार नाही, साहेबांचा चपराशी सुद्धा या पेक्षा जास्त माल घेतल्या शिवाय काम करत नाही . असे विश्वसनीय विरोधी नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटी वर आमच्या वार्ताहरा कडे कबुल केले . आपण दोघे भाऊ भाऊ भूखंड मिळून खाऊ. जय लोकशाही. म्हणून विरोधकांनी बहिष्कार घातला.
No comments:
Post a Comment