Translate

Wednesday, July 20, 2011


भिक ही मागून मिळत नसते. आणि अंगात धम्मक असेल तर अशी भिक मागायची वेळ येत नाही. जेथे मराठी भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्रात मराठीचे हाल आपण चालवले आहेत , त्यांना मराठी शाळेत न घालता फालतू हिंग्लिश शाळेत घालतो तेंव्हा आपली मुले धेडगुजरी मोडकी तोडकी हिंग्लिश बोलतात आणि आपण पाहुण्यान समोर त्यांना JACK AND JILL च्या तालावर त्यांची इच्छा नसताना नाचावयास लावतो. राजकारणी मराठीच्या नावावर हजारो करोडोची माया जमा करत मराठीच राजकारण करतात. आणि साहित्यिकांची पुढची पिढी तर सिलिकॉन व्हालीतच वाढते, हे हे साहित्यिक सोयीस्करपणे विसरतात आणि गुगुलला मराठीची सोय करा म्हणुन सांगतात असा दांभिकपणा फक्त मराठी माणूसच करू शकतो. आधि आपण मराठीमय व्हा गुगल आपोआपच मराठी होईल.
आपण गुगल ला सांगण्या आधि स्वतः मराठी टायपिंग चे चांगले मराठी सोफ्टवेअर का तय्यार करू शकत नाही. जे कांही २ - ४ आहेत ते सामान्य माणसाला वापराने अशक्य .........................


आहे. उलटसुलट काळा दाबून टाईप करत बसावे तेंव्हा कोठे थोडेफार मराठी टाईप होते. त्यापेक्षा गुगलचे मराठी आणि इतर भाषांचे टाईप सोफ्टवेअर खूपच सोपे आहे. गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!

बरोबर आहे.आपण ज्या भाषांचा उल्लेख केला तेथील लोक स्वतःच्या भाषेचे राजकारण करत घर भरत नाही. त्यांनी उच्च शिक्षण सुद्धा स्वतःच्या भाषेत देणे सुरु केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण बालवाडीतले शिक्षण सुद्धा इंग्रजीत देण्यात धन्य मानतो. कोण्या मुख्यमंत्र्याच्या पत्राने आंतरराष्ट्रीय कंपन्या काम करायला काय त्या सरकारी महामंडळ आहेत. जेथे त्यांना फायदा दिसतो तेथे त्या काम करतात. १५ वर्षा पासून मुंबई महापालिकेत मराठी राजकारण्याचे राज्य असून सुद्धा मुंबईतील दुकानांचे नावाचे फलक आपण सुद्धा मराठीत करू शकत नाही. फक्त मतांचे राजकारण करत दोन दीवस फोटो काढून घेण्यात धन्य मानतो..

बॉम्बस्फोटाचे सुद्धा आपण राजकारण करतो. काय या बॉम्बस्फोटात फक्त मराठीच मरतात ? UP बिहारी मरत नाही का? कींवा असे बोंब तय्यार होत असतील की त्यांचा स्फोट झाल्यावर फक्त मराठी माणूसच मरेल आणि त्या स्फोटा जवळचे UP बिहारी हे मानवी बोंब स्फोट झाल्यावर ही जिवंत राहतील.

दोन मराठी माणस भेटली तर हिंदीत कींवा अर्ध्या पेक्षा जास्त संभाषण हिंग्लिश मध्ये करतात. ज्या मराठीच्या जीवावर आपले नेते राजकारण करतात त्यांच्या येथील कामगार हे परप्रांतीयाच आहे. आपण लोग कामचोर आहोत म्हणुन up बिहार आंध्रा मधुन कामगार आयात करावे लागतात. काय महाराष्ट्रात कामगार नाहीत काय? आज महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प घ्या तेथे हे आयात केलेले कामगार काम करत असतात . सकाळी ६लाच काम सुरु करून फालतू वेळ न दवडता सायंकाळी अंधार पडे पर्यंत इमनेइतबारे काम करत असतात. आणि मराठी माणूस १०ला कामावर येऊन येऊन तंबाखू खात ११ ला काम सुरु करतो नंतर दुपारचे जेवण सुट्टी थोडा आराम आणि काम सुरु झाले की घरी जायची गडबड सुरु. कोण तुमचा आदर करेल. मराठी मुल कामा पेक्षा कोणाचातरी झेंडा खांद्यावर घेऊन मावालीपणा, टाग्गेगिरी करत व्यसन करत दीवस घालवतात. मग यांना सुधारण्यापेक्षा परप्रांतीयांना शिव्या घालून मतांचे राजकारण करणे सोप्पे. मग मराठी भाषा मराठी माणूस गेला खड्ड्यात आमची पैश्याची मताची तिजोरी भरली म्हणजे झाले. आधि सक्षम व्हा . मराठीचे रडगाणे गाण्यास वेळच मिळणार नाही.


--

6 comments:

Anonymous said...

सद्य परिस्थितीचे खरे खुरे वर्णन आपण केले आहे. मी आपल्या या मताशी सहमत आहे. माझ्या अनुभवाने हि गोष्ट मला पटली आहे. आमच्या संस्थेची कथा काही यापेक्षा वेगळी नाही.

Best Regards,

Nilesh Indani

Anonymous said...

Sameer Mane aabhari aahe...
agadi manapasun patal..aani marathi softwearch mhanshil tar, agadi kharr aahe...

Anonymous said...

ירדנה ששונקר

khup khare ahe tumche than than pall

Anonymous said...

ירדנה ששונקר
kon ahet tyana tabd tob saja kara

Anonymous said...

Ganesh Chalke

thanx ha tuze vichar lay bhari ahe ha...... ganesh

Anonymous said...

aruna erande

show details 2:25 PM (1 hour ago)


तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. आपणच मराठीचा आग्रह धरत नाही तर गुगल ला काय पडलंय?