Translate

Saturday, July 30, 2011

राष्ट्रपिता जरी आजच्या निवडणुकीत उभे राहीले तर त्यांच्या निवडणुकीची अनामत रक्कम ही जप्त होईल

ज्यांना जराही जनाधार नाही त्यांनी जनाधाराच्या बळावर स्थापन झालेल्या सरकारला आज्ञा करण्याचा आव आणावा यात ज्यांना विसंगती दिसत नाही ...... ही लोकशाही व हा देश मान्य करणार आहे काय? ......... 
यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा . 

प्रचलित लोकप्रतिनिधीना काय जनाधार आहे??? त्यांनी निवडून येण्यासाठी काय काय लबाड्या, बेईमानी केली. धर्माधर्मात,विविध भाषिकात तेढ कशी


निर्माण केली  ,  जातीजातीत कसा द्वेष पसरविला. बाई,बाटली आणि पैश्याच्या मोबदल्यात मते कशी विकत घेतली.  अखेरच्या क्षणी हार दिसू लागल्यावर मतमोजणी अधिकाऱ्याला  हाताशी धरून पराजयाचे रुपांतर विजयात कसे करून घेतले हे शेंबडे पोर ही सांगू शकेल. आपले गृहमंत्री कसे निवडून आले हे बेईमानी चे  ठळक उदाहरण आहे. एव्हढेव काय इंदिराजींनी देखील बेईमानी करूनच निवडणूक जिंकल्या होत्या. आणि न्यायालयाने दणका  देताच देशात आणीबाणी पुकारून स्वतःची सत्ता राखण्याचा खटाटोप केला. पण जनतेने धडा शिकवलाच ना. जनतेचे दुर्देव्य निवडून आलेले विरोधी देखील नालायक निघाले आणि परत इंदिरा गांधी निवडून आल्या. आणि मग त्यांनी स्वता:चे राज्य राखण्यासाठी देशाला भिंदरवाला च्या दहशदवादा लोटले. आणि पंजाबसह सर्व देश  अशांत केला. गळ्या पर्यंत आल्यावर देशाच्या सैनिकां च्या प्राणाची आहुती देऊन हे प्रकरण कसेबसे शांत केले. पण देशाच्या जनतेच्या मनावर झालेल्या जखमा कायम राहिल्यात. कोणता ही दहशदवाद आपल्या जन्मदात्याचा बळी घेतो या न्यायाने यात इंदिराजीचा बळी गेला पण यांच्या चमच्यानी वर्तमानपत्राच्या संपादकीय भाटानी त्यांच्या देश तोडण्याच्या कट कारस्थाना कडे दुर्लक्ष करत   त्यांनी देशासाठी हुतात्म्य पत्करले असा हिटलरच्या ग्लोबल्सला ही लाजवेल असा अपप्रचार केला. जणू कांही यांनीच देशाचे रक्षण केले.
 सुधारणा केल्या, जनतेचा शैक्षणिक आर्थिक स्तर वाढला राहणीमान सुधारले तर जनता पुन्हा आपल्याला निवडून देणार नाही या भिती पोटी जनता अज्ञानी , गरीब कशी राहील याचे धोरण  अवलंबले. सरकारी योजना आखून त्याचा फायदा जनतेला देण्या पेक्षा स्वतःला स्वतःच्या नातेवाईकांना करून देण्यातच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला. याला लोकशाही नव्हे तर बेईमानी, भ्रष्ट्रशाही म्हणतात.
आज हीच भ्रष्ट्र निवडून आलेली नेते मंडळी  लोकपाल समर्थकांना प्रचलित व्यवस्थेत निवडून येण्याचा आणि व्यवस्था बदलण्याचा मानभावी सल्ला देत आहेत. कारण यांना पक्के माहीत झालेले आहे आपल्या भ्रष्ट्र व्यवस्थेत ही मंडळी निवडून येउच शकत नाही. हीच मंडळी काय ज्याचे नाव हे काँग्रेसवाले उठता बसता घेऊन भारतीयास अहिंसेने स्वराज्य मिळविले असा खोटा इतिहास रचतात ते महान राष्ट्रपिता जरी आजच्या निवडणुकीत उभे राहीले तर त्यांच्या  निवडणुकीची अनामत रक्कम ही जप्त होईल आणि त्यांच्या विरोधातील एखादा गावगुंड महाबली बाहुबली निवडून येईल. एव्हढा त्यांचा दारूण पराभव होईल, हे माहीत असल्या मुळेच हे गुंड टग्गे आण्णा हजारेना निवडणुकीत निवडून येण्याचे आव्हान करतात.

जी व्यवस्था उभी करण्यासाठी हा देश गेली शंभर वर्षे राबला ती उद्ध्वस्त करण्याचा हा आततायी प्रयत्न आहे............हा  देश  स्वातंत्र्य होऊन उणीपुरी ६० वर्ष झाली..... आणि ही व्यवस्था उभी करण्यास १०० वर्ष लागले हा मूर्ख जावई शोध कोण्या महाभागाने लावला......... आणि स्वातंत्र्या नंतर याच भ्रष्ट्र साखळीचे राज्य आहे. पहिला महाघोटाळा खुद्द पंडित नेहरुच्याच काळात त्यांच्या लाडक्या पक्ष कार्यकर्त्याने केला. काळाबाजार भ्रष्ट्राचार करणाऱ्यास जाहीर फाशी द्यावी अशी मागणी करणाऱ्या नेहरूंनी त्याच्या विरुद्ध कांही कार्यवाई केलीच नाही ....उलट गेल्या ६० वर्षात भ्रष्ट्राचाराने हजारो लक्ष करोडो मापता येणार नाही एव्हढा भ्रष्ट्राचार एक एक मंत्री करू लागला.    आणि ज्या प्रामाणिक, इमानदार धारीयांचे नाव घेतले त्यांचाच या भ्रष्ट्र व्यवस्थेने बळी  घेतला. म्हणुनच  त्यांनी या भ्रष्ट्र राजकारणाला कंटाळून निवडणुकीतून कायमची  माघार घेत फक्त समाजकारण करत जीवन जगण्याचे व्रत अंगिकारले. ज्या अविनाश धर्माधिकार्यांचे पुण्याला कौतुक आहे त्यांना सुद्धा या भ्रष्ट्र व्यवस्थेने पाडले. किरण बेदी सारख्या लाखो प्रामाणिक अधिकाऱ्यांना सडविले तर भ्रष्ट्र अधिकाऱ्यांना खटले चालू असताना सुद्धा अधिकाराच्या सर्वोच्च स्थानी बसविले. न्यायालयाने दम दिल्यावर राजा आणि कलमाडी ना नाईलाज झाल्याने जेल मध्ये टाकले. लालू सारख्या जनावराच्या चारयात सुद्धा पैसे खाणाऱ्यास गरज होती म्हणुन मंत्री केले. नेत्यांचे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून त्यांचा स्वतःची  सत्ता राबवण्यासाठी दुरुपयोग करून घेतला , अश्या भ्रष्ट्र व्यवस्थेला तुम्ही लोकशाही म्हणतात. त्या महात्म्याचे स्मरण करून जनाची नाही तरी मनाची लाज तरी   तुम्हास वाटायला पाहिजे. पण नाही ....उलट आम्हीच शहाणे आम्हाला लोकांनी निवडून दीले ही मिजास आपण मारतात .

जनतेने तुम्हाला एक चांगला देश निर्माण करण्या करता निवडून दीले. हे लक्षात न घेता भ्रष्ट्राचार, बेईमानी काळाबाजार यातच तुम्ही बुडून गेला. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत धान्याचा उपयोग खाण्या पेक्षा दारू उत्पादन करण्यात  केला. देशात धार्मिक, जातीय भाषिक ,प्रांतिक  तेढ निर्माण करत जनतेत भांडणे लावण्याचा आणि देशाचे विभाजन करण्याच्या तुमच्या कारवायांना आळा बसत असल्या मुळे तुमचा शिमगा चालू आहे.
तुमच्यात हिम्मत असेल तर सरळमार्गाने निवडणूक लढावा आणि निवडून या. आणि अश्या सरळ मार्गाने निवडून आलात तर तुम्ही देश विकला तरी जनता सिव्हील सोसायटी आज जी आपणास आज विरोध करत  ब्लैक  मेल करत आहे ती आपणास विरोध करणार नाही. मग आहे का हिम्मत सरळ मार्गाने निवडून येण्याची?

1 comment:

Anonymous said...

aruna erande

show details 11:21 AM (28 minutes ago)

सगळे खरे, आणि म्हणूनच संताप होतो की आपण काही करू शकत नाही.आपण मत दिले नाही तरी तेच निवडून येणार, किंबहुना म्हणूनच !