निवडणूक महा नगर पालिका ......मी मत विकत घेणार नाही.... जाती धर्म यांचा
आधार घेत निवडणूक लढवणार नाही......मी समाज मंदिर, प्रार्थना स्थळे यांना
देणगी देऊन मताची भिक मागणार नाही.......निवडूण आल्यावर नाली साफ
ठेवण्याचे, पाणी पुरवठा नियमित करण्याचे आणि खड्डे विरहित रस्ते बांधण्याचे
काम इमाने इतबारे करेन.....भ्रष्ट्र गुत्तेदारशी हातमिळवणी करणार नाही....
नगरपालिकेच्या कामाच्या रिंग मध्ये सामील होणार नाही.....स्वतः च्या
स्वार्था साठी सत्तेच्या घोडेबाजारात सामील होणार नाही..... पक्ष बदल करणार
नाही.......जनतेची वैयक्तिक कामे करणार नाही तर..... फक्त सामाजिक हिताचीच
कामे करेन याची मी हमी देतो......अशी स्पष्ट भूमिका कोणताही निवडणुकीस उभा
टाकलेला उमेदवार का घेत नाही...... आणि जनता सुद्धा अशी मागणी का करत
नाही???.......
No comments:
Post a Comment