Translate

Wednesday, April 18, 2012

एका नवहिंदू धर्माची जरूरी आहे.......

येसुदास याना मंदिर प्रवेश नाकारला..........स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली.......सामाजिक एकात्मतेच्या गप्पांचे ढोल रात्नदिवस बडवताना राज्यकर्ते थकत नाही......पण खरी परिस्थिती कांही लपत नाही ....... आणि....आज ही मंदिर प्रवेश नाकारण्याच्या घटना राजरोस घडत असतात .......कांही मंदिरात देवाच्या दर्शनाचा जाहीर लीलाव लावून गरीबाना तासनतास रांगे मध्ये रखडवले जाते........गलीच्छ मंदिरात जागोजागी लुबाडले जाते......तरी ही हिंदू संस्कृती महान चे ढोल बडवणारे कांही कमी....
Navnath Pawar
जो देव माणसाला ओळखत नाही, त्या देवाला मीही ओळखत नाही. ताठ मानेने ठोकर मारून निघा त्या देवाला. खरा देव ... ज्ञानेश्वरीत वर्णिलेला आहे ...>>उत्तमाते धरिजे, अधम तरी अव्हेरिजे,. हे काहीच नेणीजे, वसुधा जेवी. ...गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊनी मारू,. ऐसे नेणेची का करू, तोय जैसे>> <<का घराचीया उजियेड करावा, पारखिया अंधार धरावा .. हा भेद नच ठावा, दीपा जैसा >> असा देव फक्त निसर्ग नियमात सापडतो... बाकी देव आणि देवळे ही दलालांची मंदिरे आहेत.
Vijay Sabnis एका नवहिंदू धर्माची जरूरी आहे, ज्यात मूळ तत्त्वज्ञान कायम ठेऊन, इतर धर्मातील काही चांगल्या गोष्टी घेऊन, खरा बहुजन समाजाभिमुख झालेला धर्म असेल.

No comments: