पत्र नव्हे मित्र !!!.......कालाय तस्मे नम:
पत्र
नव्हे मित्र !!! अशी शेखी मिरवणाऱ्या महाराष्ट्र टाईम्स चा दर्जा एखाद्या
थ्री एक्स पिवळ्या वर्तमान पत्राचा झाला हे महेंद्र कुलकर्णी काकांनी
मटाबाबा डॉट कॉम Posted on ऑगस्ट 4, 2011 काय वाटेल ते या लोकप्रिय ब्लॉग्ज
वर दीली होतीच http://kayvatelte.com/2011/08/04/%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE/.
त्यात त्यांनी म्हंटलेच होते.......मटा ची ऑन लाइन एडीशन म्हणजे एखाद्या
पोर्नोग्राफी साईटला लाजवेल अशी आहे. काय छापावं- आणि काय नाही ,नग्नता
किती प्रमाणात दाखवावी,याचा विधिनिषेध न बाळगता, चीप, व्हल्गर, आणि सेक्स
ने परिपूर्ण असलेले काही फोटो तरी पेज हिट्स वाढवायला छापायचे – असे प्रकार
मटा ने सुरु केलेले आहेत. फोटोमधे काय दाखवले आहे हे सुद्धा इथे
लिहीण्याची मला लाज वाटते, त्या साठी ही लिंक पहा. असे फोटो छापण्यासाठी
निर्लज्ज पणा लागतो . इतका निर्लज्ज पणा अंगी मुरवायला पण खरंच गेंड्याची
कातडी लागते, असे ही काकांनी म्हणले होते........यावर १०० हून जास्त
वाचकांच्या प्रतिक्रया आल्या होत्या आणि महेद्रजींचे म्हणणे खरे आहे असे
स्पष्ट नमूद केले होते.....याचा प्रत्यय आजकाल म टा नेट वर उघडल्या बरोबर
येत आहे. access to is blocked for your protection असे म्हणत इंटर नेट
सेक्युरिटी ही साईट ब्लॉक करत आहे......सोबत याचे चित्र दीले
आहे.......पत्र नव्हे मित्र या पासून पत्र नव्हे पोर्न वाटाड्या अशी म टा
आज अधोगती झाली आहे.....एव्हढेच नव्हे तर एकेकाळी शासनावर नैत्तिक अंकुश
ठेवणारे हे वर्तमान पत्र आज शासनाचे बटीक झाले आहे. कालाय तस्मे नम:
No comments:
Post a Comment