Translate

Sunday, April 29, 2012

सूक्ष्म MICRO लोडशेडिंग प्रकल्प....MAHAVITARAN



विजेची चोरी, वितरणातील हानी आणि विक्री केलेल्या वीज बिलाची सांगड घालत महा.वीज वितरण गाव शहर पातळीवर लोडशेडिंग करत वीज पुरवठा ८-१० घंटे बंद करत आहे. पण ज्या  विभागातील ग्राहक प्रामाणिक पणे वीज बिल भरतात त्यांना या  सरसकट वीज बंदीचा फटका बसून त्यांचे नुकसान होते आणि कमी वीज पुरवठ्या मुळे वसुलीवर आणखी विपरीत परिणाम होतो हे लक्षात घेवून महा.वीज वितरण     कंपनीने  वीज वितरण आणि बिल वसुलीचा तुलनात्मक अभ्यास करून लोडशेडिंग चा नवीन नमुना कार्यक्रम आखला आहे.....या नुसार गाव/शहर पातळीवर सरसकट  लोडशेडिंग चा नव्याने कार्यक्रम आखला जात आहे. या नव्या सूक्ष्म MICRO लोडशेडिंग प्रकल्पा नुसार  गावात/ शहरात आता विभाग/वार्ड या घटकाचा अभ्यास करण्यात आला आहे. या नुसार ज्या वार्ड/विभागात वीज चोरी जास्त त्या विभागात जास्त लोडशेडिंग आणि ज्या विभागात वीज चोरी कमी वसुली समाधानकारक  आहे त्या विभागाला बक्षीस म्हणून त्या विभागाची लोडशेडिंग कमी करणे असे सूत्र अवलंबण्यात येणार आहे...सूत्र तर ठरले आहे...आणि या सुत्रा नुसार परभणीतील वसमत रस्त्यावर बिल वसुली समाधानकारक असल्याने या रस्त्यावर राहणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. या विभागात लोडशेडिंग कमी करून घेण्या करता आता या विभागातील नागरिकांनी वीज वितरण कंपनी कडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 

त्याच बरोबर आपण ज्या विभागात राहतात त्या विभागाच्या वीज चोरी आणि बिल वसुली याचा अभ्यास करून महावितरण कडे या संबंधी वारंवार पाठपुरावा करून आपल्यावर विनाकारण होणाऱ्या लोड शेडींग च्या त्रासातून मुक्ती मिळवावी. हे काम तसे अवघडच आहे. पण आपण जर सांघिक प्रयत्न केले तर यश मिळेलच.....आपणास जास्त वेळ विना-व्यत्यय वीज मिळेल ...आणि याचा महत्वाचा सामाजिक फायदा म्हणजे वीज बिल नियमित 



भरले, तर आपल्या विभागातील लोडशेडिंग कमी होईल हे इतर विभागातील  जास्त लोडशेडिंग असलेल्या  नागरिकांना समजेल आणि एक दिवस चांगल्या वसुली मुळे लोडशेडींग हा शब्द वापरावा लागणार नाही.....चला तर आता आपल्या विभागातील वसुली चा अभ्यास करा....वेळ प्रसंगी या करता माहिती अधिकार वापरा. आपली मते अवश्य मांडा 

No comments: