उमेदवार:-
हुश्श !!!! मतदान संपले .......संपली एकदाची कटकट.........चेहऱ्यावर
खोटेखोटे हासू आणत राहणे, नाही त्या लोकांच्या पाया पडणे........आश्वासन
देणे नुसता वैताग आला होता..... एका एका मतासाठी लोक सुद्धा किती भाव खायला
लागलेत?.........५००० रुपये एका मता साठी.....काय खाक सेवा करणार निवडून
आल्यावर........ काय कराव दुसरा इलाज नव्हता......५ वर्षाच्या दुकानदारी
साठी हा सगळा पैशाचा तमाशा करणे भागच होते .... एव्हढे करून निवडून आलो तर
ठीक नाही तर खर्च केलेले २०-२५ लाख पाण्यात.....आणि कार्यकर्त्ये तर
विचारूच नका....गेले महिना भर कोंबडी मटन पव्वा याच्या शिवाय कश्याला ही
हात लावत नव्हते.....त्या हॉटेलवाल्याचच बिलच १० लाख झाले......अडव्हांस
दील्या शिवाय त्याने कोणाला खाऊ घातल नाही.... निवडून आल्यावर पहाव लागेल
त्याच्या धंद्याच्या परवान्या कडे.......
मतदार:- चला संपले...... नको त्या लोकांच्या आपल्या घरी चक्करा मारणे...
कोण कोठला माणूस उठतो....आणि निवडणुकीस उभा राहतो........घरी येऊन वय न पाहता कोणाच्याही पाया पडतो.... आणि आमच्या विकासा साठी आमची मते मागतो.... गेल्या
दिवसा पर्यंत हा कोठेच दिसत नव्हता आता एकदम याला जनतेचा कळवळा आलाय.... तो
दुसरा तर चक्क पक्ष बदलून कोणत्याच पक्षाने तिकीट न दील्याने एका रात्रीत
अपक्ष म्हणून उभा राहीला..आणि सर्व पक्ष भांडवलदार श्रीमंताचे आहेत.... मीच
फक्त गरीबांचा वाली तारणहारा आहे म्हणू लागला...... एका ने तर गेल्या ५
वर्षात खालेल्या पैश्यातून वार्डात स्वतः च्या खर्चाने रस्ता नाली बांधकाम
सरकारी परवानगी शिवायचं सुरु केले........ एकाने विमानतळ आणण्याचे गाजर
दाखवले तर दुसऱ्याने चक्क सरकारी तिजोरच आमच्या साठी खुल्ली करण्याचे जाहीर
केले, जशी कांही ही तिजोरी यांच्या बापजाद्या ची आहे................
पण
आता आम्ही ही शहाणे झालो आहोत....यांच्या भूलाथापाना आता आम्ही बळी
पडायचं नाही हे पक्क ठरवलं......इतके दीवस लोकशाही म्हणून प्रामाणिकपणे जात
पात धर्म पैसा न पाहता मतदान केल........ तर ..... निवडून आल्यावर हे
तंगड्या वर करणार.........पैश्याच्या जोरावर सत्तेच्या घोडेबाजारात आपली
कींमत वसूल करत टोप्या बदलणार........विविध पदा साठी स्वतःची खरेदी विक्री
करणार....सामुदायिकपणे सहलीला जाणार...... काल पर्यंत विडीकाडी ला महाग
असणारे हे नेते आज VAT69 , माणिकचंद, मुर्ग मस्सलम बिर्याणी शिवाय तोंडात
कांही घालतच नाही..... कामधंदा नाही इन्कम टक्स नाही तरी ही यांची
मालमत्ता मारुतीच्या शेपटी प्रमाणे वाढत जाते...... अनेक भूखंड यांच्या
नावावर होतात...... बाथरूम मध्ये सुद्धा चार चाकी शिवाय जात नाही.....
शासनाच्या पैश्याच्या योजनेत टक्केवारीने सर्वपक्षीय नगर-सेवक हिस्सा खाणार
....... रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून पोट भरणाऱ्या कडून हप्ता
खाणार......हप्ता मिळाला नाही तर सु शोभिकारणाच्या नावा खाली जनतेस त्रास
होईल अश्या योजना आखणार ........मग आम्हीच का प्रामाणिकपणे मतदान
करावे......चांगले खणखण वाजवून पैसे घेतले.......जातीच्या धर्माच्या माणसा
कडून ही घेतले.......त्याला ही सोडले नाही..........नाही तरी निवडूण
आल्यावर तो मातीच खाणार .........जय लोकशाही जय हो .....
No comments:
Post a Comment