Translate

Tuesday, April 24, 2012

स्त्रीत्वाचा बझार मांडून कंपनी करोडोचा फायदा ........

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12854501.cms  आजच्या बाजारीकरणाच्या जगात माल खपविण्या  साठी  स्त्री ला उपभोग्य वस्तू म्हणून सदर केले जाते...हे नवीन नाही............आता आपणाला ही आता या हीण दर्जाच्या जाहिरातीचे कांही वाटेनासे झाले.....उलट आम्ही सुधारणे चे ढोल बडवत आहोत.....कोणी विरोध करायला गेला कि तुमच्या नजरेत पाप आहे......म्हणायला हे उदारमतवादी तय्यारच असतात ......

ग्राहकांच्या बुभुक्षित नजरेला हेरून जाहिरातदारांनी या जाहिरातबाजीत अत्यंत खालची पातळी गाठत महिलांच्या गुप्तांगावरील त्वचा गोरी करणा-या क्रीमच्या  जाहिरातीचा जोरदार प्रचार आपला माल खपवण्या साठी सुरु केला......आपले सरकार आपले राजकारणी नेते  तर ग्लोबलाजेशन च्या नशेत चूर असल्या मुळे त्यांना या जाहिरातीची लाज लज्जा वाटायची गरज वाटत नाही......महिलांच्या गुप्तांगावरील त्वचा गोरी करणा-या क्रीमच्या वादग्रस्त जाहिरातीचा जोरदार निषेध करत संबंधित कंपनी आणि जाहिरातदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेत केली. ही निव्वळ विकृती असल्याचे सांगत सरकार याविरुद्ध काहीही पाऊल उचलत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. खासदार टी. एन. सीमा यांनी या जाहिरातीवर त्वरित बंदी आणण्याची मागणी केली पण कॉंग्रेस सरकार ने काँग्रेसचे स्त्री लंपट खासदार व प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांची CD ज्या वेगाने  बंद केली ती जलद कार्यवाई ही जाहिरात बंद करण्या बाबत सरकारने दाखवली नाही........आता चर्चेचे, चोकशी चे गुरहाळ सुरु होईल....बंदी येण्यास दिवस जातील आणि तो पर्यंत स्त्रीत्वाचा बझार मांडून कंपनी करोडोचा फायदा कमावून बसेल जय ग्लोबलाजेशन.........

No comments: