Translate

Tuesday, April 24, 2012

ब्रेन ड्रेन

उशीरा का होईना सरकार ने पांढऱ्या कॉलर च्या देशाच्या संपत्तीवरील राजरोस चालणाऱ्या दरवडेखोरीला आळा घातला हे बरे झाले..... भारतात सर्व शिक्षण सवलती घ्यावयाच्या , स्वस्तात शिक्षण घ्यावयाचे आणि एकदा डिग्री हातात पडली की देशाच्या व्यवस्थेच्या उणीवा दाखवत परदेशाचे गुणगान करत उच्च शिक्षणा करता परदेशी जायचे आणि पैश्याच्या लोभा खातर मग भारतात परत यायचेच नाही. असा हा फंडा गेली ६५ वर्षे भारतात राबवला जात होता...पण आता असला दुपट्टीपणा चालणार नाही .सरकारने आता या अनिष्ट गोष्टीना आळा घातला हे बरे झाले....http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12844638.cms
उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाऊन तिथेच प्रॅक्टिस सुरू करणा-या डॉक्टरांची संख्या वाढत असताना, या 'ब्रेन ड्रेन'ला रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी नवा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, अमेरिकेत जाण्यापूर्वी आता डॉक्टर्सना स्वदेशपरतीची हमी देणारा करार करावा लागणार असून अभ्यासक्रम संपवूनही न परतणाऱ्या डॉक्टरला अमेरिकेत प्रॅक्टिस करण्यापासून रोखण्याचा अधिकार सरकारला असणार आहे.त्याच बरोबर खेडोपाडी माफक दारात ओषध उपचार करण्या करता डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत म्हणून इतर डिप्लोमा कोर्स प्रमाणे मेडीकॅल डिप्लोमा कोर्स सुरु करण्याची सर्व तय्यारी पूर्ण केली.. पण यास शहरतील प्रस्थापित कट प्रक्टिस डॉक्टर लोबी कडून जोरदार विरोध होत आहे......या मुळे खेड्यातून या लोबी कडे येणारे रोगी कमी होतील हे भय यांना सतावत आहे.

No comments: