मराठवाड्यातील दुष्काळ
पाण्याची टंचाई, चारापाण्या शिवाय खंगत चाललेले पशुधन उजाड होणारी गावे
खेडी या पेक्षा या भागातील लोकप्रतिनिधीचा नियोजन शून्य कारभाराचा
नमुना.......योजना राबवण्याच्या कल्पनेचा दुष्काळ याचा फटका मराठवाड्यातील
जनतेला जास्त बसत आहे......आजच्या
बाजारीकरणाच्या युगात प्रत्येक गोष्टीचा पद्धतशीर प्रचार करावा लागतो तरच
त्या वस्तू ची विक्री होते .दुष्काळाचे हि तसेच आहे ...जो पर्यंत तुम्ही
दुष्काळाच्या नावाने मिडीयाला हाताशी धरून बोंबा बोंब करत नाही.... तो
पर्यंत शासकीय मदत तुमच्या पर्यंत पोहंचत नाही.....आणि हे ध्यानात घेवूनच
पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारा पासून ते ग्रामपंचायती सर्वांनी दुष्काळा
ची पद्धतशीर ओरड चालू केली .....
वास्तविक संपूर्ण महाराष्टातच दुष्काळ पडला
आहे. मराठवाड्यात तर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा जास्त दुष्काळ आहे...पण या
बद्दल कोणता ही राजकारणी बोलत नाही....इतर विभागातील नेत्यांचे जावू द्या
...पण आपल्या विभागातील नेते सुद्धा तोंडाला चिकट पट्टी लाऊन गप्प बसले
आहे......जनतेच्या वेदना या नेत्यांना समजत नाही हेच मराठवाड्यातील जनतेचे
दुर्भाग्य आहे......निसर्गाच्या दुष्काळा पेक्षा मराठवाड्याच्या नशिबी
असलेला नेत्यांच्या नियोजनाचा विचारांचा दुष्काळ जास्त भयानक आहे......
राज्यातील 31 जिल्ह्यांत टंचाईच्या झळा बसत आहेत. मराठवाडा, विदर्भातील
मोठी शहरे तहानलेली असतातच. त्यात यंदा पश्चिम महाराष्ट्रातील नगर,
सांगली, साताऱ्यातील बराचसा भाग आणि सिंधुदुर्गमधील काही तालुक्यांची भर
पडली आहे...तरी ही आपण अजून झोपेतच आहोत.