Translate

Friday, January 6, 2012

अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी

छातीत दुखतंय म्हंटल की संपूर्ण कुटुंब हादरून जातं. नको नको ते विचार मनात येतात . आजारपणा पेक्षा कुटुंबाच्या भाविताव्यानेच रोगी जास्त आजारी पडतो. ओषध उपचाराचे प्रचंड आकडे डोळ्या समोर नाचत असल्या मुळे .... सुरवातीस पेशंट या कडे दुर्लक्ष करतो....पण अखेर त्याला दवाखान्याची पायरी चढावीच लागते. .....  आणि मग सुरु होतो , एक जीवघेणा  प्रवास. इसीजी , स्ट्रेस तपासणी, असंख्य रक्त लघवीच्या चाचण्या पेशंट हतबल होतो... आणि ४-५ दिवसांनी डॉक्टर म्हणतात हृदयाला धोका आहे. मोठ्या शहरात जाऊन अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी  करावी लागेल. डॉक्टर ला देव मानत  त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या या देशात रोगी त्याचे नातेवाईक शहर गाठतात. आधीच फोन फोनी झाल्या मुळे शहरातील डॉक्टर तय्यारच असतात...सर्व  अर्थाने .... पेशंट आल्या बरोबर त्याच्या  परत एकदा शारीरिक तपासण्या सुरु होतात...............
 
 
 
२४ तासा आधीच  पेशंटच्या  गावाकडील डॉक्टरने केलेल्या चाचण्याची कागदपत्रे बिनदिक्कतपणे केराच्या टोपलीत टाकली जातात. कांही विचारण्याची सोय नसते ....फट म्हणता डॉक्टर रागवायचा आणि पेशंटच्या जीवा वर बेतायचे .,,,,,,,,,  हा गेम परत परत दररोज  या व्यवसायात चालत असतो... कट प्रक्टिस द्वारे खिसा कापला जातो हे सर्व माहिती असून ही जनता कांहीच करू शकत नाही.....आणि .... ग्लोबलायझेशन , मेडिकल हब, जागतिक मेडिकल टुरिझम च्या शेख चिल्ली स्वप्नात  असल्या मुळे या दरोडेखोरी कडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही.......जास्तीत जास्त जनता आजारी पडणे आणि तीला महागात महाग ओषोधोपचार मिळवून देणे म्हणजे विकास .......मग बंग सारखे डॉक्टर मुलांच्या कुपोषणाच्या समस्येवर  कीती ही पोटतिडकीने बोलो....... त्या कडे लक्ष देण्यास नेत्यांना नौकरषाहीला वेळ नाही....

चांचण्यां च्या केस पेपरचा गंभीरपणे अभ्यास करत असल्याचा आव आणत दुसरी कडे पेशंटच्या खिशाचा अंदाज घेत डॉक्टर सिरीयस होतात ...... दोन धमन्यां रक्त वाहिन्या .....पूर्ण बंद ......  बाकीच्या दोन ८०% बंद ...... त्वरित अन्जिओप्लास्टी  करावी लागेल.. पेशंटच्या जगण्याची खात्री नाही...... असे ऐकल्यावर नातेवाईक पेशंटचा मुलगा आर्थिक कुवत नसताना ही हा अवाढव्य खर्च करण्यास तय्यार होतो..... इलाज नाही केला आणि कांही  वाईट तर नातेवाईक समाज टपलेलाच असतो बापा चा इलाज केला नाही म्हणुन....
आणि मग २-४ लाखाचा फटका कुटुंबास बसतो.....हा आर्थिक खड्डा बुजवण्यास मुलाच्या तारुण्याची ४-५ वर्षे निघून जातात....
 
.......बरे एव्हढा खर्च करून ही कधी कधी डॉक्टरच्या हलगर्जीपणा मुळे पेशंटच्या जीवाचे वाईट झाले तर; तुमचे हात विविध कागद पत्रावर तुमच्या सह्या घेऊन आधीच कापलेले असतात. पाश्च्यात देशात सुद्धा अश्या सह्या घेतल्यावर डॉक्टरने हलगर्जी पणा केला तर त्यास न्यायालयात खटल्याला समोर जावे लागते , त्यास जबर शिक्षा ठोठावली जाते... मायकेल जैकसन च्या उपचारात हलगर्जीपणा केला म्हणुन त्याच्या डॉक्टर वर खटला भरून वर्षाच्या आत त्याला शिक्षा थोठावण्यात         पण भारतात मात्र असे खून करून डॉक्टर सहीसलामत सुटून समाजात प्रतिष्ठित म्हणुन वावरत असतात. ......कारण कायदा गाढव आहे......


याच आठवड्यातील गोष्ट ......एका ५९ वर्षाच्या नागरिकाच्या हृदयात दुखत होते........ नेहमी प्रमाणे त्यास त्वरित अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी  करण्याचा स्थानिक डॉक्टरांनी सल्ला दीला , आणि मोठ्या शहरातील दवाखान्यात त्याची रवानगी केली......मोठ्या शहरातील प्रसिद्ध दवाखान्यत पोहचे पर्यंत निरोप मिळालेले असल्या मुळे सर्व व्यवस्था सुसज्ज झाली होतीच.....कांही तासातच.....अन्जिओग्राफी करून डॉक्टरांनी ८० % रक्तवाहिन्या ब्लोक झाल्या चे निदान करत रुग्णाच्या जीवास धोका आहे. या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी अन्जिओप्लास्टी करणे कसे अत्यावश्यक आहे हे सांगत अन्जिओप्लास्टी  ची तय्यारी सुरु केली ....८०% ब्लोकेज मुळे नातेवाईक घाबरून गेले आणि त्यांनी अन्जिओप्लास्टी  होकार देत डॉक्टरांनी समोर केलेल्या कागदपत्रांवर मुकाट्याने सह्या केल्या ..... कांही विचार करण्यास वेळच नव्हता .....आणि पर्यायी डॉक्टर शी बोलण्यास संधीच नव्हती......आणि.....अन्जिओप्लास्टी  सुरूही झाली.... समोर पडद्यावर सर्व दीसत होते आणि काय होतंय हे समजण्याच्या आताच बलून फुटला ........रुग्णाच्या जीवावर बेतले करण बलून फुटाणे हे धोकादायक .......थोडक्यात  रुग्ण वाचला पण पुढची बायपास सर्जरी करण्यासाठी स्पेशल कसायाच्या हातात जाण्या साठी....कारण या शहरात बायपास करण्याची कोणतीही व्यवस्था नाही...  बलून का फुटला याचे कांही कारण माहीत नाही.... डॉक्टर सांगत नाही.... हा सर्व आपल्या नशिबाचा दोष मानत नातेवाईक गप्प ........बलून वर जास्त दाब आल्यामुळे बलून फुटला ........हे तर सत्य आहे. ...... पण डॉक्टर जबाबदारी घेत नाहीत.......आधीच सह्या घेऊन त्यांनी पळवाट निर्माण करून ठेवली.......जबाबदारीचे दायित्व ठरवण्याची व्यवस्था आपण का निर्माण करत नाही???....... अश्या बेजबाबदार वागण्यावरून मग नातेवाईक बेभान होतात आणि डॉक्टरांवर हल्ले करतात........ डॉक्टर मग मगरीचे नर्काश्रू ढाळत आमच्या वरील हल्ल्या विरुद्ध आजामिनपात्र गुन्हा ठरवावा म्हणुन पेड न्यूज मार्फत शासनावर दबाब आणतात. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला तर तो आजामिनपात्र गुन्हा ठरवावा असा कोणी आवाज उठवत नाही आणि पेड न्यूज नसल्या मुळे वर्तमानपत्रे आणि मिडिया सुद्धा या कडे लक्ष देत नाही....


नागपुरातील एक घटना . मराठवाड्यात व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरला रात्री ११ वाजता नागपूरहून वडील सिरीयस आहेत  आणि त्यांना हार्ट रुग्णालयात अति अति दक्षता विभागात दाखल केले असा घरून फोन येतो. वडिलांचे वय ६५ च्या पुढे ... प्रकृती ठणठणीत असलेले ... डॉक्टर मुलगा रात्री दोन  वाजता नागपूरला जाण्यास निघतो. सकाळी १० वाजता नागपूर हार्ट हॉस्पिटल मध्ये अति दक्षता विभागात वडिलांना पाहण्यास जातो .... तर वडिलांना वेगवेगळ्या नळ्यांनी जखडलेले मोंनिटर वर हृदयाच्या स्पंदनाचा ग्राफ चालू असतो.......मुलगा तेथील डॉक्टरा कडे वडिलांच्या प्रकृतीची चोकशी करतो उपचाराची फाईल मागतो....  . आम्ही नातेवाईकांना जास्त माहिती देत नाही .... मुलगा परत म्हणतो सर मी त्यांचा मुलगा आहे...... तरी पण डॉक्टर नकार देतात. अखेर मुलगा म्हणतो आहो मी सुद्धा होमोपथी डॉक्टर आहे आणि मला माझ्या वडिलांच्या प्रकृतीची चांगली माहिती आहे. त्यांना काय झाले हे तर मला समजू द्या... तरी पण हॉस्पिटल चे डॉक्टर नकार देतात.... आता मात्र मुलगा चिडतो ... आणि त्यांच्या हातातील वडिलांचे केस पेपर असलेली फाईल हिसकून घेतले .... आणि फाईल उघडली....फाईल पाहून मुलाला आश्यर्याचा धक्का बसला फाईल मध्ये कोणताही केस पेपर कींवा उपचाराचा कागद नव्हता........आता  डॉक्टर मुलाने रागाने याचा जबाब विचारला तर स्टाफ ने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.......  उपचार सुरु केले ते कोणत्या आधारावर सुरु केले याचे उत्तर ही स्टाफ कडे नव्हते. रात्री १० वाजता अडमिट केलेल्या रुग्णाच्या तपासणीची आजाराची उपचाराची कोणती कागदपत्रे  १२ तासा नंतरही   तय्यार नव्हती.......... तरी खर्चाचे मीटर ५ आकडी संख्या पार करून गेले....... मुलाने वडिलांचा डिसचार्ज मागितला तर तो ही नाकारण्यात आला.... आम्ही अपूर्ण उपचारावर डिसचार्ज देत नाही असे सुनावले गेले......मुलगा रागारागाने ICU मध्ये गेला ... वडिलांना लावलेल्या सर्व नळ्या काढल्या ECG बंद केला.... आता वडिलांनी मोकळा श्वास घेतला ....... पाणी पिले......आणि त्यांनी जी हकीकत सांगितली टी ऐकून  कोणाला  ही राग चीड आल्या शिवाय राहणार नाही..........

आदल्या रात्री विवाह समारंभात जेवण जरा जास्त झाले....... आणि नंतर हे सर्व रामायण महाभारत...... घडले .......पोटातील वायू पास न झाल्याने त्याचा दाब छातीवर पडला आणि छातीत वेदना सुरु झाल्या...वांत्या उलटी करायचा प्रयत्न पण वाया गेला... घरचे सदस्य घाबरून गेलेत ....... त्यांनी मग नागपुरातील या प्रसिद्ध हार्ट रुग्णालयात दाखल केले...... आणि पेशंट ने काय झाले हे सांगायच्या आधी कींवा न ऐकता ICU मध्ये दाखल केले आणि नळ्या जोडणे ECG सुरु केले......... सकाळी सकाळी ५ वाजता पेशंटला उलट्या झाल्या ......त्याने बरे वाटते म्हणुन सांगायचा परत  केला...... पण .......नळ्या पुन्हा चढवल्या गेल्यात.......मुलगा आला नसता तर त्यांनी नक्कीच बायपास केली असती........कींवा गेला बझार अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी  करून १-५, २ लाखाचे मीटर नक्कीच  फिरवले  असते....... परत निघताना परत स्टाफ आडवा आला... आणि रात्रीच्या मुक्कामाचे खोली भाडे ( आज काल उपचार पेक्षा दवाखान्याच्या खोल्यांच्या भाड्याचा धंदा च  जोरात चालला आहे. ...उपचाराचे १५ हजाराचे बिल पुढे केले ...त्या शिवाय पेशंटला नेता येणार नाही असे धमकी वजा बजावले....... पण बाप लेक खमके  होते त्यांनीच स्टाफ ला चैलेंज केले .....आणि कोणता ही खर्च देत नाही सांगून अडवून दाखवण्याचे आव्हान दीले ....... आणि सरळ घरी आले........आजची  मेडीकल व्यवस्था ही रुग्णाच्या फायद्या साठी नाही तर डॉक्टर, ओषध उत्पादक कंपन्या , विक्रते ...... मेडीकल विमा कंपन्यांच्या फायद्या करता राबवली जाते हे म्हणतात तेच खरे आहे.....
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.COM

1 comment:

Anonymous said...

फेस बुके aksharasha khare aahe!
14 hours ago · Like

ירדנה ששונקר
than than pall bhartat garibane kiva khedekarane ajari hone hich mothi shiksha ahe ani gunha ahe
8 hours ago · Like · 1

फेस बुके
आज माझ्या मते ९०% डॉक्टर्स कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रामाणिक नाहीत.म्हणजे मालप्राक्टीस/कट/वगैरे प्रकार करतात. आजकाल सर्व चांगले डॉक्टर्स सुध्दा आळशी झाले आहेत.कारण कट फुकटात मिळतो.मग पेशंटला आणखी पुढे म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये पाठवतात. म्हणजे रिस्क नाही.आणि भरपूर पैसा! माझ्याच एका मित्राने एका साईटवर इथिकल डॉक्टर्स म्हणून एक कम्युनिटी स्थापन करून फक्त प्रामाणिक असणाऱ्या लोकांनीच आपल्याला रिक्वेस्ट्स पाठवाव्यात म्हणून आवाहन केले होते.मला सांगताना फार वाईट वाटते की त्या साईटवर त्याचे शेकडो मित्र असूनही त्याला कुणीच रिक्वेस्ट पाठवली नाही.कारण हा त्यांना जाणून होता;आणि ते सुध्दा जाणून होते,आपली रिक्वेस्ट रिजेक्ट होईल! आजही तो एकटाच त्या कम्युनिटीत आहे!

यातील जे ९% डॉक्टर्स आहेत,ते नाईलाजाने प्रामाणिक असतात.कारण संधिवाचून चारित्र्यवान अशी आपल्याकडे एक म्हण आहे,ती अक्षरशः यांना लागू होते! आणि उरलेला १% जो असतो,तो खरा इथिकल प्राक्टीशनर असतो! हा सामान्यतः फार आर्थिक प्रगती करू शकत नाही! म्हणून खूप ज्ञान असूनही हा शेवटी सामान्यच ठरतो!