Translate

Saturday, January 7, 2012

खासदार आणि आमदार निधी

MLA MP ला  जो  कोट्यावधी  रुपयाचा  निधी  मिळतो  त्यात  महाघोटाले    होतात . मतदारसंघातील विकासाची कामं करणं वा नागरी सुविधा मिळवून देणं यासाठी खासदार आणि आमदार यांच्यासाठी निधी ठरवून देण्यात आला आहे. अगदी ज्यांना भौगोलिक मतदारसंघ नाही, अशा राज्यसभा आणि विधान परिषद यांच्या सदस्यांनाही हा निधी आहे. या दोन सभागृहांचे सदस्य तर हा निधी देशभरात वा राज्यभरात कुठंही विकास कामांसाठी वापरू शकतात. लोकसभा आणि विधानसभा सदस्यांना मात्र आपल्याच मतदारसंघात तो वापरता येतो. खासदार आणि आमदार निधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निधीचा वापर कोणत्या कामासाठी करावा, याची शिफारस त्यांनी करायची असते आणि सरकारी यंत्रणेमार्फत ती कामं केली जातात. कार्यकर्ते सांभाळ निधी   खासदार, आमदार निधीतून होणाऱ्या बहुसंख्य कामांचे स्वरूप, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, हातपंप, व्यायामशाळा या प्रकारचे असते. लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच ठेकेदार होऊन व सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागातील नौकारशाही ला हाताशी धरून करतात . यातील बहूसंख्य कामे निकृष्ट, हलक्या दर्जाची असतात, ज्याचा जनतेला कांही उपयोग होत नाही... तर फक्त कार्यकर्ते सांभाळण्या साठीच या निधीचा दुरुपयोग केला जातो.....पण तेरी भी चूप मेरी भी चूप

या  फंड्स  मधून  काय काय  जनउपयोगी  काम  झाले  याची माहिती   प्रत्येक  जिल्हया च्या  collector.nic.in ,  zp.nic.in या सरकारी  साईट  वर  दर  महिन्याला  माहिती  टाकली पाहिजे .. तसेच  ग्रामीण  भागात आणि शहरी नगरपालिके मध्ये काम  न  करताच  करोडो  रुपयांची  बिले  उचलली  जातात. एकाच रस्त्याचे, कामाचे  अनेक वेळा बिल उचलले जाते.... पण रस्ता, योजना काम कांही दीसत नाही...  .
 
या  करता  या  योजना  त्यांचा  खर्च  सुद्धा  नेट संगणकावर  ग्राम पंचायत , नगर पालिकेच्या साईट वर कार्यालयात    जाहीरपणे  लावावा . जनतेला समजेल तरी आपण दिलेला कर कसा खर्च होतो. त्या खर्चाला कसे पाय फुटतात कामे खरच झाली का??? हे तपासता येईल.
 
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

No comments: