क्रिकेटपटू च्या निवृत्ती नंतर त्याचं कामगिरीचा गौरव
करण्या करता त्याच्या नावाने गौरव सामना आयोजित केला जातो. त्यास पैश्याची
थेली अर्पण केली जाते. ....... त्याच प्रमाणे आता सचिनच्या नावाने एक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गौरव सामना मुंबई च्या वानखेडे घराच्या मैदानावर
आयोजित करावा ....... पैश्या करता नव्हे तर महाशतक साजरा करण्या करता .......
सचिन महाशतक गौरव सामना असे या सामन्याचे नामकरण करून जगातील प्रत्येक
देशातील एक क्रिकेटपटू असे २२ खिलाडू खेळाडू निवडून त्यांचे दोन
प्रतिस्पर्धी संघ निर्माण करावेत.... एक सचिन महाशतक संघ आणि दुसरा दोन
सचिन महाशतक संघ . यात इंडिया तर्फे फक्त सचिन यालाच खेळवावे. सचिन च्या
महाशतका करता विशेष क्रिकेट चे धावचीत चे नियम तय्यार करावेत.... सचिन ला
१०१ धावा झाल्या शिवाय बाद करू नये. सचिन ० वर जरी बाद झाला तरी त्यास पुढे
खेळू द्यावे.... तो धाव बाद, झेल बाद त्रिफळा चित झाला तरी तो बाद नाही
झाला हे समजून त्यास पुढे खेळू द्यावे . सचिनच्या महाशतकाच्या वेळी सर्व
संघ बाद होऊ नये आणि शतक अर्धवट राहू नये म्हणुन संघातील शेवटच्या बाद
होणाऱ्या खेळाडूस सचिन चे शतक होई पर्यंत खेळण्याची संधी द्यावी . या मुळे
सचिनच्या महा शतकाच्या यज्ञा ची सफल सांगता होईल. त्या मुळे इंडियास अनेक
फायदे होतील..
सचिनच्या शतकाच्या महा शतका च्या नशेत जनता चूर झाल्या मुळे जनता
भ्रष्ट्राचार बेईमानी, राजकरणी नौकरशहा यांच्या विरुद्ध उठाव होणार
नाही.....
सचिन सन्मानाने बाद झाल्यावर निवृत्त होईल त्या मुळे नव्या दमाच्या खेळाडूना खेळण्याचे संधी मिळेल. ..........
TV मिडिया वर्तमानपत्रे यांच्या पुढील ६ महिन्याच्या ब्रेकिंग न्यूज ची
महा चर्चा यांची काळजी मिटेल........या चर्चां मुळे अनेक हवशे नवशे गवशे
यांना TV वर सचिनच्या कार्यक्रमात रोजगार मिळून झळकण्याची संधी
मिळेल.........
गर्वाने म्हणा, मी महाराष्ट्राचा म्हणत गर्वच नाही माज आहे म्हणणाऱ्यांची चलती होईल ..........
भारत रतन सचिन ला जाहीर झाल्या मुळे सचिनचा नाही तर भारत रत्न चा हा गौरव झाला आहे, म्हणत संपादकीय स्वतः:चे उखळ पांढरे करून घेतील......
भारत रतन सचिन ला जाहीर झाल्या मुळे सचिनचा नाही तर भारत रत्न चा हा गौरव झाला आहे, म्हणत संपादकीय स्वतः:चे उखळ पांढरे करून घेतील......
या निमित्य अनेक कंपन्या सचिन ब्रांड च्या वस्तू निर्माण करून इंडियाच्या विकासात मोठा हातभार लावतील...........
मुंबई मधील एखादी १५-२० एकरची बंद कापड गिरणी जबरदस्ती ने बळकावून राम आणि
कृष्ण यांच्या स्वरुपात सचिन क्रिकेट खेळत असताना च्या मुरत्या स्थापन
करून त्याचे भव्य क्रिकेट स्टेडीयम सारखे भव्य महाशतक मंदीर उभारून त्याचे पद्धतशीर मार्केटिंग शिर्डीच्या साईबाबा सारखे करता येईल.........
मराठी माणूस असलेल्या सचिनच्या असामान्य खेळाचे श्रेय....... मन_ से घेण्या
करता दादरच्या शिवाजी पार्क वर जोरदार सभा होतील आणि मुंबईत पुन्हा
मराठीचा आवाज घुमेल.......
सचिनला आपल्या खऱ्या मराठी माणसाच्या पक्षात घेण्या करता काका पुतण्यात लढाई जुंपेल..........
तर आम्हाला सचिन ची नाही तर टग्ग्यां ची आवश्यकता आहे असा
आवाज पुण्याच्या शनिवार वाड्यावर पिंपरी चिंचवड च्या मैदानावर
घुमेल.........
सचिनच्या महान कामगिरी बद्दल त्यास अब्दुल कलाम सारखे राष्ट्रपती करावे आणि
ताई नंतर महाराष्ट्राचा झेंडा परत एकदा राष्ट्रपती भवनावर फडकवा का ? यावर
पहा जनता काय म्हणते म्हणत विविध वाहिन्यांवर जनमत कौल घेतले जातील.......
शरद पवारजी IPL च्या धर्तीवर सचिन कप चे २०-२० सामने भारतभर सुरु करून
प्रत्येक नेत्यांच्या संघात झुंज लावतील........विलासराव , माणिकराव ,
कृपा शंकर , पतंगराव, भुजबळ , पृथ्वीराज , शिंदे , कामत नारायण राणे
यांच्या संघा बरोबरच विरोधी संघ मुंढे , राज, उद्धव अश्या अनेक छोट्या
मोठ्या राजकारण्यान चे संघ भाग घेतील........मराठवाडा विदर्भाच्या
राजकारण्यांच्या संघाना मागासलेपणाचा शाप येथे ही भोवेल...........त्यांचे
संघ कागदावरच राहतील......
या सर्व गडबडीत व्यावसायिक सचिन कोण्या तरी परकीय देश्यातील क्रिकेट
खेळाडूना भारता विरुद्ध कसे डावपेच लढवायचे क्रिकेट कसे खेळायचे याचे
शिक्षण देण्या करता प्रशिक्षक म्हणुन गेला असेल !!!!!!!!!! जय हो! जय हो!!
1 comment:
Nilesh Indani to me
show details 10:35 AM (7 hours ago)
एकदम सुन्दर आणि सत्य वाटावे असे लिहले आहे तुम्ही. mind blowing. Totally realistic...
Post a Comment