अहो ! मयुरजी आपण चांदोबा मधील विक्रमादित्य वेताळाच्या न संपणाऱ्या गोष्टी प्रमाणे इंडिया मधील TV मिडीयाच्या २४ तास चालणाऱ्या बातम्या पाहत नाही का? काल दिवसभर या महागाई वरच बातम्या होत्या. त्या मध्ये तुम्ही म्हणता तो सामान्य माणूस मात्र कोठेच दिसला नाही मला.
हां पण लाखो-करोडोच्या गाड्या बाळगणारे आणि उंची विदेशी दारू ढोसून नशेत बेफाम गाड्या हाकत रस्त्यावरील सामान्य माणसांचा जीव घेणाऱ्या गाड्याचे मालक मात्र पेट्रोल च्या वाढलेल्या भावा बद्दल संताप व्यक्त करत होते. .................
अनेक उच्चभ्रू स्त्रिया आपले मेकअप खराब होणार नाही याची काळजी घेत मिडिया समोर शाम्पू , लिपस्टिक, महागडी पावडर , अत्तर , तेल.... खाण्याचे नाही हो... केस तेल . हिरोईन च्या केसा प्रमाणे लांब व चमकदार दिसण्या साठी ५००-६०० रुपये प्रति किलो असणारे , ...लोण्याची क्रीमची बिस्किटे , लाडक्या डोंगी चे आवडते बिस्किट्स सुद्धा महाग झाल्याची मोठमोठ्या AC मोल मध्ये तावातावाने तक्रार करत होत्या . एकीने तर आपल्या पामेरियन श्वाना ला मुला प्रमाणे कुरवाळत आता याच्या स्पेशल डॉग फूड चा आठवड्याचा होणारा एक हजार रुपयाचा खर्च १०२५ रुपये इतका होणार म्हणुन महागाई वर सरकार वर तोंडसुख घेत या सरकार ने आमच्या कुत्र्याचे SORRY DOGI चे जगणे देखील मुश्कील केले अशी रास्त तक्रार केली तेंव्हा बरे झाले आपण श्वान पाळले नाही याचा मला खूप आनंद झाला आणि यामुळे आपला कीती फायदा झाला या बाबत मी अर्थशास्त्राचा नियमा प्रमाणे अभ्यास करू लागलो.
शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना जगाच्या अन्नदात्याला वेळेवर रास्त भावात खत बी बियाणे मिळत नाही, ते दरवर्षी काळ्या बाजारात चढ्या दराने घ्यावे लागते, त्या करता प्रत्येक वर्षी लाठ्या काठ्या खाव्या लागतात हे मात्र या मिडीयाला दीसत नाही. आणि यावेळी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे आपले राजकारणी मात्र मुंबई दिल्हीत बसून उद्योजकांच्या हातात हात मिसळून भ्रष्ट्राचार करण्यात, खताचा बियाणाचा काळा बाजार करण्यात मश्गुल असतात. सरकारी अनुदान लाटून आपली आणि आपल्या पाव्हण्यांची शेती कशी बहरेल याचेच नियोजन भ्रष्ट्र नौकारशाही ला हाताशी धरून आखत असतात. या शेतकरी राजकारणी नेत्यांना खतासाठी, बियाणा साठी लाठ्या काठ्या चा मार खावा लागल्याचे कधी दीसत नाही. हां पण निवडणुका आल्या की पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या पांढऱ्या छत्र्या प्रमाणे पांढरेशुभ्र कडक कपडे घालून आणि महात्म्याने कधी ही न वापरलेली पण त्यांच्या नावाने कुप्रसिद्ध केली गेलेली पांढरी शुभ्र कडक गांधी टोपी घालून जनतेस टोपी घालण्यास येतात . शेतकऱ्यान च्या हीता साठी निर्माण झालेल्या बाजार समितीत शेतकरी कधी दिसतो का याचा शोध घ्यावा लागेल. आपणच म्हंटल्या प्रमाणे शेतकरी मार खात असताना हे नेते मतांचा घोडेबाजार भरवण्यात मग्न आहेत . बेईमानी भ्रष्ट्राचार, पैसा खाण्याचे शेण खाण्याचे काम आपलीच माणसे करतात पण बदनाम मात्र गरीब, इमानदार मुक्या जनावाराला करतात. त्यांना बोलता येत नाही हे त्याचे दुर्देव्य . हा आपल्या महान लोकशाहीचा भ्रष्ट्र अवतार येथेच नव्हे तर लोकसभेत सुद्धा जगाच्या वेशीवर टांगला गेला. मतदानात आम्ही जिंकलो याचा जल्लोष जोरात झाला पण कसे जिंकलो याची लाज मात्र कोणाला वाटत नाही. हा आपला पराभव आहे.
No comments:
Post a Comment