Translate

Saturday, June 4, 2011

तेंव्हा कोठे गेला होता भ्रष्ट्र नेता सूता तुझा धर्म ?

भ्रष्ट्राचार बेईमानी काळाबाजार या विरुद्ध आज आण्णा हजारे बाबा रामदेव आणि INDIA AGAINST CORRUPTION , पीपल्स सोसायटीचे चे हजारो ज्ञात अज्ञात कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. हा आपल्या लोकशाही भ्रष्ट्र शासनप्रणालीचा पराभव आहे, यात वाद नाही. गेल्या ६० वर्ष भारतावर शासन करणाऱ्या कॉंग्रेस चे हे जसे अपयश आहे .त्या पेक्षा जास्त अपयश या देशातील विरोधी पक्षाचे आहे हे १०१% कटू सत्य आहे. या विषयावर विरोधी पक्षाच्या निषक्रियते मुळेच जनतेला आण्णा , रामदेव यांच्या आंदोलना कडे वळावे लागले ही विरोधी पक्षाची शोकांतिका आहे.भ्रष्ट्राचार, काळाबाजार या ज्वलंत विषयावर शासनास जाब विचारावयाचे सोडून हे विरोधी पक्ष सुद्धा भ्रष्ट्राचाराच्या गटार गंगेत आंघोळ करण्यात स्वतः ला धन्य समजू लागले. या मुळे हे विरोधी पक्षाचे जास्त अपयश आहे असे मानावे लागेल.बहरे चमन उजड़ने को एक उल्लू काफी हैयंहा तो हर डाल पर उल्लू बैठा है
आणि आज या आंदोलनाचा वणवा पेटल्यावर त्यात होरपळून जाण्याच्या भीतीने कॉंग्रेस पक्षा बरोबर विरोधी पक्ष सुद्धा हा लोकशाही शासन व्यवस्थे वर घाला घालण्याचा प्रकार आहे. या लोकांना असे आंदोलोन करण्याचा अधिकार नाही. इंग्रजाच्या काळात आंदोलन ठीक होते .आता आपल्याच सरकार विरुद्ध आमरण उपोषण करणे म्हणजे सरकारला BLACKMAIL करण्या सारखे आहे. लोकशाहीच्या प्रणाली प्रमाणे या लोकांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सत्ता हासील करावी पण बाहेरून शासनावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करू नये . असे मानभावी सल्ले देत लोकशाही वर संकट आले आहे असे म्हणत मगरीचे अश्रू ढाळत आहेत. काळाबाजार, बेईमानी भ्रष्ट्राचार यांना पाठींबा देत असताना देश कंगाल करत असताना नेत्या हो तेंव्हा कोठे गेला होता भ्रष्ट्र नेता सूता तुझा धर्म ?असे विचारावेसे वाटते.

No comments: