बर झाल महात्म्याचा चष्मा चोरीला गेला ते..... आता त्या महात्म्याला या राजकारण्यांचा काळाबाजार , बेईमानी, भ्रष्ट्राचार, गद्दारी , अत्याचार पीडीत महीला, त्रस्त सामान्य जनता मस्त टाग्गेगिरी करणारे राजकारणी , मुजोर नौकारशाही , त्यांच्याच अहिंसक मार्गाने देशहीता साठी आमरण उपोषण करणाऱ्या स्वतःच्या नागरिकांवर इंग्रजाला ही लाजवेल असा अत्त्याचार करणारे स्वदेशी काँग्रेसी सरकार , कुपोषित बालके , भाषावादाने होणाऱ्या दंगली, राजकारण्यांची अफाट डोळे दिपवून टाकणारी बेकायदेशीर संपत्ती, बापूने स्वतःह कधी ही न वापरलेल्या पांढऱ्या टोपी ला ..
गांधी टोपी नाव देऊन ती कडक पांढरीशुभ्र गांधी टोपी घालून त्या खाली काळे धंदे करणारे भ्रष्ट्र नेता, SKF रायफल बाळगून बेकायदेशीर कामात अग्रेसर असलेल्या संजू बाबा या आधुनिक गांधीगिरी ची नौटंकी करणाऱ्या नटाचा गांधीगिरीचा तमाशा या सर्व गोष्टी पाहाव्या लागणार नाहीत.त्याच बरोबर त्यांच्याच नावाने छापल्या जाणाऱ्या गांधी छाप १०००-५०० नोटांच्या सहाय्याने होणारी मतांची खरेदी-विक्री, काळाबाजार, या नोटा वापरून दारूबंदीच्या नावाखाली सत्ताधारी राजकारण्यांनी निर्माण केलेल्या दारूच्या महापुरात वाहून गेलेली गरीब जनता सुद्धा पहावी लागणार नाही. सरकारी गोदामात सडणारे अन्नधान्य आणि खायला अन्न नाही म्हुणुन उपाशी पोटी मरणारी कुपोषित बालके, जनता दिसणार नाही. अंतकवादी दहशदवादी हल्ल्याने मरणारी जनता आणि गुरु कासाबला मतांच्या लाचारी साठी दया दाखवणारे षंढ झालेले राज्यकर्त्ये पाहावे लागणार नाही. तशीच दुबळ्या सरकारची बोटचेपी अहिंसा ही पहावी लागणार नाही. कामजीवनावर विजय मिळविलेल्या बापूच्या देशात स्त्रियांच्या अब्रूवर राजरोस घाला त्यांचेच अनुयायी ही पाहावे लागणार नाही. इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वत:च्या निवडून दिलेल्या जुलमी सरकारचा गुलाम झालेला मतदार राजा पाहावा लागणार नाही....बापू या सर्व अराजक सावळ्या गोंधळा मुळे आमी तर आमचा चष्माच नव्हे आमचे डोळे सुद्धा हरवावे अशी प्रार्थना त्या परमेश्वरा कडे नेहमी करत असतो. ...... पण.... चष्मा हरवण्या इतपत आमचे नशीब बापू.......तुमच्या एव्हढे चांगले नाही..... हे आमचे दुर्दव्य .
No comments:
Post a Comment