Translate

Thursday, June 16, 2011

ज्योतिर्मय डे तुमच चुकलंच!  पत्रकार म्हणुन मस्त राहायचे, उंची स्टार हॉटेल मध्ये खायचे प्यायचे ऐष करायची. मोठमोठ्या परिषदां मधून समाजाचे बौद्धीक घेत वांझोट्या चर्चा करायच्या, सल्ले द्यायचे आणि रात्री मैफीलीत समाज कंटक आणि राजकारण्यान बरोबर ( दोन्ही ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत) सोमरसाचे  जाम रिकामे करत उद्याच्या वर्तमान पत्राच्या मुख्य पानाची पेड बातमी तय्यार करायची. अशी पत्रकारिता करायची  सोडून तुम्ही अंडरवर्ल्ड मध्ये राहून अंडरवर्ल्डशीच वैर करावयास निघालात....
 
 
........कोण सहन करेल .  बर अंडरवर्ल्ड शी वैर करत असताना कायद्याच्या भक्षकांशी  SORRY!! रक्षकाशी  सुद्धा तुम्ही वैर पत्करल. तरी पण  गेली २० वर्ष या अंडरवर्ल्ड ने आणि पोलिसांनी तुम्हाला जिवंत ठेवलं हे तुमच्या कुटुंबाचे  नशीब समजा. कोणत्या पत्रकारीच्या महाविद्यालयात तुम्ही पत्रकारीचे शिक्षण घेतले हे समजत नाही. 
आधुनिक मिडिया सम्राटा कडे जर आपण प्रशिक्षणार्थी म्हुणुन उमेदवारी केली असती तर आज तुम्ही पैश्या च्या राशी वर  अक्षरशः लोळत राहीला असता. मिडीयाच्या रात्री ९ च्या प्राईम टाईम मध्ये एकेकाची मुलाकत, ग्रेट भेट घेत स्वतःह चा मोठेपणा तुम्हाला जगाला सांगता आला असता....   आणि तुम्हाला पण कोण्यातरी ओसाड गावाच्या आखिल भारतीय वर्तमान पत्राने तुम्ही  समाज प्रबोधनाचे महान कार्य केल्या बद्दल, तुमच्या निर्भिड पत्रकारीते बद्दल . लाख दोन लाखाचा  पुरस्कार देऊन तुमचा गौरव केला असता. आणि  पुरस्कार वितरण सोहळ्यात आपण तो पुरस्कार  नाट्यमय रीत्या  परस्पर कोण्या तरी महान समाज कामाला देऊन आपली महान सामाजिक बांधिलकी मिडीयाच्या माध्यमाने जगाला दाखवून दीली असती. JD तुमच्या या महान दातृत्वास समाज मुकला .  दातृत्वाचा पैसा हा इमानदारीचाच असावा हे कोण्या हृदय सम्राटाने म्हंटले तरी त्या कडे  दुर्लक्ष करत आपलेच म्हणणे रेटण्याचा प्रकार आपणास जमण्या सारखा नव्हता ही गोष्ट वेगळी . या मुळेच पत्रकारितेच्या धोपट मार्गाने न जाता तुम्ही मृत्यूला मिठी मारण्याच्या मार्गाने गेलात.  तुमच्या बलिदानाचे भांडवल करत आजच्या जमान्यात बातमी छापण्याचे न छापण्याचे  चे बाजारीकरण करणारे पेड पत्रकार आणि मिडिया आमच्या जीवास धोका आहे म्हणत  पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत आणि कायदा  त्वरित  करावा म्हणून उर बडवत आहेत ... ही गोष्ट वेगळी .

1 comment:

aruna said...

मि नेहेमी तुमचे ब्लोग्स वाचात असते. तुम्ही घणाघाती घाव घलता. पण योग्य तेच लिहिता.