साहेब पक्ष मोठा की राजकारणी व्यक्ती मोठी हे तुम्हास सांगण्याची आमची पात्रता नाही. तरी पण एक मतदार या नात्याने लिहिण्याचा मात्र आम्हाला अधिकार आहे. लोकशाही मध्ये सत्ता बदल होतच असतात. नव्या निवडून आलेल्या नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्यां मधून त्याच्या मर्जी प्रमाणे काम करणाऱ्या माणसांची निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि जगभरातल्या सर्व लोकशाही देशात हीच प्रथा परंपरा आहे. पण हा बदल भारतीय नेत्यांच्या पचनी पडत नाही. मग ते पक्षालाच ब्लक मेल करण्यास सुरवात करतात आणि स्वतः चे हसे करून घेतात. ज्या वेळी प्रमोदजी होते त्यावेळी ही त्यांनी त्यांच्या माणसांची टीम तय्यार केली होती आणि त्यात तुम्ही प्रथम क्रमांकावर होतात. त्या वेळी ज्यांची प्रमोदजी बरोबर काम करण्याची नाळ जुळत नव्हती असे अनेक जुने जाणते कार्यकर्ते पक्षाच्या प्रवाहा बाहेर फेकले गेले होते पण त्यांनी अशी बंडाची नाटक केली नाही हे ही तुम्हास चांगले माहीत आहे. आता काळ माना प्रमाणे आपण प्रवाहा बाहेर फेकला गेला एव्हढेच ..... पक्षाने आपल्याला मोठे केले हे जेंव्हा कार्यकर्ता विसरतो तेंव्हा त्याचा ऱ्हास सुरु होतो. आणि स्वतःची मुल मुली पुतणे जावई सासू सून यांनाच आमदारकी खासदारकी ची पद मिळवून देणे ,फ्लट सरकारी भूखंड जागा बेकायदेशीर मिळवून देणे म्हणजे पक्ष कार्य पक्ष सेवा समाज कार्य समाज सेवा नव्हे. हे लक्षात घ्या
आजच्या राजकारणात राजकीय पक्ष कार्यकर्त्याच्या सामाजिक राजकीय कामा पेक्षा त्याचे उपद्रव मूल्य कीती मोठ्या प्रमाणात आहे त्यावरून त्याला सत्तेत भागीदारी देतात. यामुळे कार्यकर्ते सुद्धा कामा पेक्षा आपले उपद्रव मूल्य जास्तीत जास्त कसे वाढेल याचा प्रयत्न करत जातीचे धर्माचे नात्या गोत्याचे राजकारण करत असतात. यातूनच मग आपलीच माणसे पक्षाच्या जागां न वर सरकारी , सहकारी संस्था वर नेमली जातात. आणि पक्षातल्या विरोधी गटाचे पद्धतशीर खच्चीकरण केले जाते . महाजन-मुंढे या गटाने भाजपात ही खेळी महाजन जोरात होते त्यावेळी खेळली होती. प्रमोद महाजनांच्या काळात मुंढे - महाजनांनी भाजपमधील जुण्या कार्यकर्त्यांची राजकीय कारकीर्द केवळ आपल्या गटाचा नाही म्हणून खराब केली. दिलीप गांधी , जयसिंग गायकवाड विमल मुंदडा शिवणकर सोमय्या असे कित्येक उदाहरणे आहेत. मुंडे यांची पण काही खास पात्रता नव्हती फक्त प्रमोद महाजनाचे नातेवाईक म्हणून ते राजकारणात वरती आले पद मिळवले आणि मग लोकसेवा सुरू केली. हे कटू सत्य आहे. यामुळेच महाजनांची कवच कुंडले खतम झाली की मुंढे च्या कर्तत्व चा सुद्धा ऱ्हास झाला. आणि स्वतः चे अस्तित्व दाखवण्या साठी बंडाचे दबाब तंत्र वापरावे लागले . पण हि खेळी सुद्धा आज तरी फसली असे म्हणावे लागेल .
No comments:
Post a Comment