Translate

Tuesday, March 22, 2011

"राजा नागडा! राजा नागडा!!' ....राजा भिकारी राजा भिकारी ........

पण त्या गर्दीत एक शिशूसुद्धा होता -
साधा, सरळ, साहसी शिशू!
तो म्हणाला होता ः "राजा नागडा! राजा नागडा!!' राजा नागडा किंवा राजा भिकारी  राजा भिकारी असे राजास ठणकावून सांगणाऱ्या निरागस मुलाच्या आणि उंदीर मामाच्या कथा कविता बालपणी वाचल्या . या कविता मधील लहान मुलाच्या उंदीर मामाच्या धाडसीपणाचे   कोतूक वाटायचे. मोठी माणसे स्वार्था पोटी जी गोष्ठ सांगू शकत नाही ती बाब निरागस बालक उंदीरमामा किती सहजतेने सांगून जातात. काळाच्या ओघात राजे राजेशाही गेली. स्वातंत्र्या नंतर नावा पुरती उरलेली  राजेशाही संस्थाने  इंदिरा गांधीनी गरीबी हटाव चा नारा देत खल्लास  केली . त्यास ही आज ४० वर्षा हुन अधिक काळ लोटला. देशातील सरंजामशाही नष्ट झाली.संस्थानिकांचे तनखे रद्द झाले......



.......मात्र तरीही या देशातीन अनेकांच्या रक्तातील संरजामी गुण  गेले  नाही.उलट राजकारणी,सनदी नोकरशाहा,चित्रपट कलावंत,क्रिकेटपटू यांच्यातील सरंजामदाराची नवीन जमात या देशात निर्माण झालीय. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.या जॉर्ज ऑरवेल यांच्या वाक्याची सतत आठवण येत राहते..मोअर इक्वल या प्रकारात मोडणारे अनेक इंडिया मध्ये मिरवत असतात. ज्यांची कांही लायकी नाही असे लोक सत्ताधाऱ्यांच्या जवळकी मुळे , नाते संबधा मुळे मोठेपणा मिरवत असतात. त्यात राष्ट्रपतीच्या यजमानां पासून ते सोनियाच्या जावया पर्यंत सर्व जण आले. आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही.ही व्यक्ती आहे पंडित नेहरुंचा पणतूजावाई,इंदिरा गांधीचा नातजावाई,सोनिया गांधींचा जावई आणि प्रियंका गांधीचा नवरा रॉबर्ट वढेरा.गांधी घराण्याचा जावाईच हीच त्याची एकमेव ओळख.केवळ याच गोष्टींमुळे तो देशातील सर्वशक्तीशाली नागरिकांमध्ये जाऊन बसतो. या व अश्या अनेक जावई सून , नवरे, सासू , मेव्हण्या , मुलगा, पुतण्या  यांच्या करता  देशाचे कायदे कानून तोडणे  कोणास चूक वाटत नाही. आणि हे कोणी सांगायचा प्रयत्न केला की लगेच त्यास राष्ट्रद्रोहाच्या आरोपा खाली तुरुंगात आजीवन डांबले जाते.

.त्यांच्या या समजूतीला कोणी धक्का दिला की काही जण आदळाआपट करतात.या देशातील भोळी-भाबडी जनता मात्र त्यांच्या अशा नाटकी वागण्याला बळी पडते.त्यांचा अपमान हा स्वत:चा अपमान समजते. कोणी आपला आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करुन घेतयं हे त्यांच्या गावीही नसतं.सरंजामशाही नष्ट झाले, संस्थानिकांचे तनखे रद्द झाले परंतु संस्थानिकांना देव समजण्याची खास भारतीय प्रवृत्ती अजूनही नष्ट झालेली नाही.

या मुळेच आज ऐका निरागस बालकाची अत्यंत आवश्यकता आहे. जो या सर्वाना तुम्ही नागवे आहात हे स्पष्ट सांगेल. त्या उंदीर मामाची आवश्यकता आहे जो यांना म्हणेल नेता भिकारी..भिकारी  माझी जमीन चोरली, माझे पाणी चोरले, माझा घास चोरला  माझा देश चोरला....
 
नागडा राजा

सगळ्यांना दिसत होतं की, राजा नागडा आहे
पण तरीही सगळे टाळ्या वातवीत होते
म्हणत होते ः "वा! किती सुंदर कपडे आहेत राजाचे!'
त्यांच्यापैकी काहींवर संस्कार होते-
राजाला नावं ठेवायची नाहीत, याचे
काहीजण राजाचे मिंधे होते,
काहीजणांना कृपा हवी होती राजाची
पण त्या गर्दीत एक शिशूसुद्धा होता -
साधा, सरळ, साहसी शिशू!
तो म्हणाला होता ः "राजा नागडा! राजा नागडा!!'

आजही राजा रस्त्यावर उतरला आहे
पुन्हा सारे त्याच्या कपड्यांचं कौतुक करताहेत
पण मला तो शिशू दिसत नाहीय
कुठे गेला तो? कुणी त्याला पहाडांत, गुहेत लवपलं आहे का?
की खेळता-खेळता तो झोपून गेला आहे?
कुणीतरी त्याला पुन्हा शोधून आणा
म्हणजे तो राजाला विचारील -
"राजा, तुझे कपडे कुठे आहेत? '
- नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती
बंगाली कवी
अनुवाद : विलास गिते
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: