Translate

Friday, March 4, 2011

चोरा पासून रक्षण करण्यासाठी पोलिसाची ( मोठ्या डाकूची ) मदत मागून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे.

2011/3/4 "मन उधाण वार्‍याचे.......  कांदिवलीमध्ये असलेली यांची एक जुनाट बिल्डिंग, दुरून भुत बंगलासारखीच दिसते. पावसात घरात भिंतीतून पाणी झिरपत, शॉक लागतो..सिमेंटचे बांधकाम हात लागला की असच तुटून पडत. नुसता फटाका जरी वाजला, तरी बिल्डिंग हादरते. खुप प्रयत्‍न करून सरतेशेवटी ह्या बिल्डिंगच्या रीकन्स्ट्रक्षनसाठी बीएमसीकडून परवानगी मिळाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये सगळ्यांना घर खाली करायला नवीन बिल्डरने सांगून ठेवल होत. घर खाली करताना बिल्डर ह्यांना ११ महिन्याचे भाड्याचे पैसे देणार होता, पण आता ऑफीसर बदलला, फाइल अडकली, परत सगळी प्रक्रिया परत करावी लागणार ह्या भीतीने ती सगळी १५-१६ कुटुंब मोठी रिस्क घेऊन तिथेच राहत आहेत. जे व्हायच ते होऊ देत. देव बघून घेईल काय ते ह्याच आशेवर.

सगळी यंत्रणा सडलेली आहे, अंधार आहे. पण एक तारा जोमाने चमकत आहे..... त्याचे तेज वाढत आहे. फक्त गरज आहे ती या ताऱ्याच्या प्रकाशात मार्गक्रमण करण्याची.... बरोबर आहे..... माहितीचा अधिकार २००५ वापरा. महाराष्ट्राच्या हजारे आण्णांनी भारतीयांना दिलेली ही एक अमूल्य देणगी आहे. आपण आपल्या मैत्रिणीला या कायद्याचा वापर करण्यास सांगा. कांही मार्गदर्शन हवे असेल तर मी देईन .मुंबईत अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या आपल्याला हा अधिकार कसा वापरावा याचे मार्गदर्शन करतात. आपण मध्यमवर्गीय अधिकाराचा वापरच करत नसल्याने या भ्रष्ट्र नौकारशहा आणि नेत्यांचे फावते. मिडिया बद्दल बोलून   XXX  दगड टाकून आपल्या अंगावर शितोडे उडवून घेण्या सारखा प्रकार आहे.  आणि मिडिया किंवा माणसे, शिवसेना कॉंग्रेस किंवा कोणत्या ही पक्षा कडे मदत मागणे म्हणजे चोरा पासून रक्षण करण्यासाठी पोलिसाची ( मोठ्या डाकूची ) मदत मागून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे.

2011/3/4 "मन उधाण वार्‍याचे...

No comments: