डॉ. अमोल अन्नदाते
स्वाइन फ्लूची कोंडी फोडणारा ‘स्वाइन फ्लू नव्हे भीतीची साथ’ हे बेधडकपणे लिहिण्यास आम्हाला तोंडावरचा मास्क काढून ‘लोकप्रभा’ने जागा दिली. आता आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्समधून त्या गोष्टींची वाच्यता होऊ लागल्यावर स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू व एकूणच या सगळ्या फ्लू षड्यंत्राची भांडेफोड करण्यासाठी आणि काही ‘इंटरनॅशनल ब्रेकिंग’ साठी आम्ही हीच जागा निवडतोय.

मला परवा एका खेडय़ातील शेतकरी रुग्णाने सहज विचारले - ‘‘काय हो सायेब? ते मागे फेपरात ‘स्वाइन फ्लू स्वाइन फ्लू’ म्हनायचे ते आता न्हाय का ओ? ते कुटं गेलं आता?’’ म्हाताऱ्याच्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते. पण गेल्या काही महिन्यांची मेडिकल जर्नल्स आपण चाळली तर स्वाइन फ्लू कुठून आला? कुठे गेला? का आला? याचे काही धक्कादायक खुलासे आपल्याला वाचावयास मिळतील. या स्वाइन फ्लूच्या संदर्भातील चर्चा कुठल्याही शहाण्या माणसाची मती गुंग करणारे आहेत. म्हाताऱ्याच्या स्वाइन फ्लू विषयीच्या प्रश्नाने मी जुन्या स्वाइन आठवणींमध्ये रमून गेलो. जुल - ऑगस्ट 2009 मध्ये जेव्हा स्वाइन फ्लूच्या नावाने हाहाकार सुरू होता तेव्हा स्वाइन फ्लूची कोंडी फोडणारा ‘स्वाइन फ्लू नव्हे भीतीची साथ’ हे बेधडकपणे लिहिण्यास आम्हाला तोंडावरचा मास्क काढून ‘लोकप्रभा’ने जागा दिली. आता आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्समधून त्या गोष्टींची वाच्यता होऊ लागल्यावर स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू व एकूणच या सगळ्या फ्लू षड्यंत्राची भांडेफोड करण्यासाठी आणि काही ‘इंटरनॅशनल ब्रेकिंग’ साठी आम्ही हीच जागा निवडतोय.
हा स्वाइन फ्लूचा व्हायरस नेमका कुठून आला? खुद्द ब्रिटिश मेडिकल जर्नल काय म्हणते ते पाहू या. स्वाइन फ्लू व्हायरसमध्ये उत्तर अमेरिकन बर्ड, स्वाइन आणि मनुष्याची गुणसूत्रे आढळून आली आहेत आणि हे कॉम्बिनेशन नसíगकरित्या हवामानात निर्माण होणे अशक्यप्राय असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मग हे कॉम्बिनेशन कुठे झाले? काही रिसर्च लॅबरेटरीमध्ये हे कॉम्बिनेशन अपघाताने होऊन तिथून लीक झाल्याची धक्कादायक शक्यता खुद्द ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. नरसंहारासाठी राखून ठेवलेल्या व्हायरसच्या स्टॉक म्हणजेच बायोटेरिझम लॅबरोटरीकडे काहींनी बोट दाखवले आहे. ही शंका कदाचित खोटीही असेल. पण ज्या जागतिक आरोग्य संघटनेवर अख्ख्या जगाच्या आरोग्याची जबाबदारी आहे. अशा संस्थेबद्दल स्वाइन फ्लूच्या संदर्भातील चर्चा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर केलेली स्वाइन फ्लू ची जागतिक साथ (पॅन्डेमीक) हे फार्मा कंपन्यांना मदत करण्यासाठी रचलेला एक कट असल्याचे बोलले जात आहे. दस्तरखुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच स्वाइन फ्लूच्या साथीला पॅन्डेमीक (जागतिक साथ ) म्हणणे चुकीचे होते व पॅन्डेमीक जाहीर करण्यास आम्ही घाई केली असे अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे दोन ज्येष्ठ सल्लागार ‘टॅमी फ्लू’ हे स्वाइन फ्लू साठीचे औषध विकणाऱ्या फार्मा कंपन्यांच्या पे रोलवर असल्याचे दिसून आल्यावर या गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या. स्वाइन फ्लू ची साथ जाहीर झाल्यापासून टॅमी फ्लू या औषधाचा अब्जावधींचा खप आजवर भारतात झाला आहे. एवढेच काय पण जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखालाच स्वाइन फ्लूच्या संदर्भात काही जर्नल्सनी आरोपीच्या िपजऱ्यात उभे केले आहे.
स्वाइन फ्लू सोडा पण या आधी बर्ड फ्लू, सार्स अशा अनेक आजारांच्या साथी घोषित झाल्या. भीती पसरली आणि नंतर या आजारांविषयी कुठेही वाच्यता झाली नाही. अशा साथीच्या बातम्या आल्या की त्यावर तातडीची उपाययोजना केल्याचे चित्र निर्माण केले जाते. उपाययोजना म्हणजे काय? तर वर्तमानपत्रातून - ‘घाबरू नका, चांगला आहार घ्या, सहा तास झोप घ्या, फळे खा’ अशी निवेदने प्रसिद्ध करणे. हे सांगायला साथ कशाला हवी आहे. हे निवेदन आरोग्य खात्याने रोजच वर्तमानपत्रात द्यायला हवे. साथ असल्याचे जाणवले की पुन्हा त्या आजाराविषयी पुढे संशोधन काय झाले? ते नेमके काय होते? साथी दरम्यान कुठल्या चुका झाल्या? याबद्दल शासनाच्या कुठल्याही जबाबदार व्यक्तीकडून काहीही प्रतिक्रिया येत नाही याचे आश्चर्य वाटते. स्वाइन फ्लची साथ आल्यावर या आजाराच्या जन-जागृतीसाठी कोटय़ावधींचा निधी जाहीर झाला. कुठे गेला हा निधी? कुठे झाले जनजागरण? खाजगी रुग्णालयांना शासनाने स्वाइन फ्लूच्या निदानासाठी पुरविलेल्या किट्सचे काय झाले? स्वाईन फ्लूसाठी खाजगी मेडिकलमधून टॅमी फ्लू विकण्याची परवानगी शासनाने दिली होती. पण मग साथ ओसरल्यावर या परवानगीचे, या औषधांचे काय झाले? मेडिकलच्या दुकानात बऱ्याचदा कपडय़ांच्या दुकानासारखा स्टॉक क्लिअरन्स असा प्रकार असतो. म्हणजे फार्मासिस्टस् दर महिन्याला एक्सपायरी जवळ आलेल्या औषधांची यादी आणून देतो आणि ‘साहेब जरा एवढा स्टॉक लवकर क्लीअर करा ना’, अशी विनंती करतो. मग एक्सपायरी जवळ आलेल्या टॅमी फ्लू चे नाव स्टॉक क्लिअरन्स यादीमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको. तसेच स्वाईन फ्लूच्या लसीचे. या लसीमुळे अमेरिकेत हजारो लोकांना अपाय झाले. अमेरिकेत एका रुग्णालयात तर परिचारिकांनी ही लस अनिवार्य करण्यात आली तेव्हा या विषयी शासनावर न्यायालयात दावा दाखल करून तो जिंकला. तरीही भारत सरकारने या लसी खरेदी केल्या. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी व किती तरी शासकीय डॉक्टरांना ही लस मोफत घेण्यासही नकार दिला. तरीही रुग्णांना आम्ही ही लस विकतो आहे. ‘‘साहेब जरा स्टॉक देखो ना’’ म्हणून या लसीचा मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह दर महिन्याला भेटतो. ‘येथे स्वाइन फ्लू लस उपलब्ध आहे’. हे मी फाडलेले स्टिकर दर महिन्याला न चुकता रिसेप्शनवर जाताना चिटकवून जातो.
स्वाइन फ्लू काय? बर्ड फ्लू काय? सार्स काय? किंवा अजून कुठला आजार काय? मुळात आम्ही मृत्यूला, आजारांना एवढे घाबरलेले आहोत की कुठलेही नाव घेवून आम्हाला कोणीही घाबरवू शकते व वाट्टेल ते औषध आमच्या गळी उतरवू शकते. कारण मुळात आमच्या प्रतिकारशक्तीवरच आमचा विश्वास राहिलेला नाही. कुठलाही आजार बरा होण्यामध्ये जिवाणूपेक्षा रुग्णाची प्रतिकारशक्ती महत्त्वाची असते. या जर्म थिअरीचा जनक लुई पाश्चर हजारो वर्षांपूर्वी सांगून गेलाय. काही दिवसांपूर्वी एका खेडय़ातील रुग्ण एका औषधाची पुडी पुढे करत मला म्हणाला - ‘‘साहेब या पोराला जरा नीट बघा! गावातल्या डॉक्टरने सांगितले की याला माकडगनिया झालाय. चिकनगुनिया नंतर म्हणे गावात माकडगनियाची साथ आलीय’’. स्वाइन फ्लूप्रमाणेचे आता हा माकडगनिया कुठून आला? या विचारात मी पडलो!
amolaannadate@yahoo.co.in

No comments:
Post a Comment