Translate

Wednesday, December 29, 2010

काळे अठरा अध्याय असलेल्या आपल्या महान लोकशाही देशाला तरी म्हणतात मेरा देश महान!!

१) आपण अश्या देशात राहतो जेथे भारतातील देश बांधवाना  मदत करणे हा गुन्हा आहे तर देश बांधवाना लुटणे हा इंडियन सत्ताधाऱ्यांचा हक्क आहे.
२) आपण अश्या देशात राहतो जेथे भ्रष्ट्राचार, बेईमानी, भूखंड ,शिक्षण माफिया बाहुबली गुंड  हे सत्ताधारी होतात आणि समाजसेवक जेल मध्ये सडतात.
३) आपण अश्या देशात राहतो जेथे १९४७ पासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताना भ्रष्ट्राचारी बेईमान देशद्रोही यांना जाहीर फाशी देण्याची पंतप्रधान घोषणा करतात पण तेच भ्रष्ट्र लोक सत्ताधारी होतात.


४) आपण अश्या देशात राहतो जेथे सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा देवून सुद्धा  देशद्रोही अफजलगुरूला मतांच्या लाचारी करता फाशी दिल्या जात नाही.आणि गेल्या साठ वर्षात आपण केलेली पापे झाकण्या साठी विनायक सेन ना समाजसेवा केल्या बद्दल जेल मध्ये सडवले जाते.
५) आपण अश्या देशात राहतो जेथे १०-१५% विकासा साठी ८५% चें जीवन उध्वस्त केले जाते.आणि या विरुद्ध आवाज उठवला तर त्यांच्यावर  गोळ्या घातल्या जातात.
६) जगातील महान अर्थतज्ञ असलेल्या पंतप्रधानांना कांद्याचे , जीवनावश्यक वस्तूंचे भाव अचानक कसे वाढतात याचे आश्यर्य वाटते.
७) आपण अश्या देशात राहतो जेथे १८५७ च्या कायद्याचा आधार घेत देशप्रेमी ला देशद्रोही ठरविले जाते.
८) आपण अश्या देश्यात राहतो जेथे सडक, पाणी आणि वीज या मुलभूत सोयींचा सुद्धा विकास झाला नसताना आपले नेते इंडिया ही जागतिक महासत्ता झाली असल्याचे खोटे ढोल बडवतात.
९) आपल्यावर दहशदवादी हल्ले झाल्यावर कोणतीही प्रतिलष्करी कार्यवाई न करता आपण त्याचे पुरावे घेवून जगभर मुर्खा सारखे फिरतो.
१०) मुलाच्या जन्मा आधि पासून  ते मृत्यू नंतर ही संस्काराचा ससेमिरा चुकत नाही.
११) जात-धर्म या भोवती सारे राजकारण, समाजकारण  फिरत असताना पोकळ धर्मनिरापेक्षतेचा, सर्वधर्म समभावाचा आव आणत राजकारणी  बहुसंख्यांची अव्हेहालना करत अल्पसंख्याकानचे तळवे चाटतात .
१२) आपण अश्या देशात राहतो जेथे भ्रष्ट्राचाराचे शिक्षण शाळेत प्रवेश घेण्या आधिच प्रवेश घेताना देणगीच्या रूपाने  सुरु होते.
१३) आपण अश्या देशात राहतो जेथे जनतेला खाण्यास अन्न मिळत नाही पण  राजकारणी नेते अन्नधान्या पासून दारू तय्यार करण्याचे कारखाने काढतात.
१४) आपण अश्या देशात राहतो जेथे चपराशी म्हणून काम करण्यास ही  कांही शैक्षणिक पात्रता लागते. पण  महामार्ग उभारण्याऱ्या  गुत्तेदाराला ,  राष्ट्र कारभार करणाऱ्या राजकारणी नेत्यांना कोणतीही शैक्षणिक पात्रता लागत नाही.
१५) आपण अश्या देशात राहतो जेथे लोकशाहीचा चोथा स्तंभ म्हणविणारी वर्तमानपत्रे सत्ताधारी राजकारण्यांची बटिक झाली आहेत. तर न्यायालय ही खरोखरच अंध झाली आहेत .
१६)  आपण अश्या देशात राहतो जेथे राजकीय नेतेच सुपाऱ्या देवून गेम करण्याचे कारस्थान करत असतात.
१७) आपण अश्या देशात राहतो जेथे वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला याचे दाखले देत दरोडेखोर, गुंड , स्मगलर राज्यकर्ते बनतात पण वाल्मिकीं सारखे रामायण मात्र कोणी लिहित नाही.
१८) देश्या करता शहीद झालेल्या जवानांच्या विधवांच्या नावा खाली राजकारणी, नोकरशाह , आणि सैन्याधिकारीच आदर्श घोटाळा करतात. आणि सुपारी देवून आपला गेम केला गेला अशी भलावणी करतात.
 काळे अठरा अध्याय असलेल्या आपल्या महान लोकशाही देशाला तरी म्हणतात मेरा देश महान!!

Thanks & regard,
Thanthanpal,    
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: