Translate

Friday, December 17, 2010

विकीलीक्स अहिंसेच्या मार्गा पेक्षा अधिक परिणामकारक आहे

बेईमानी, सरकारी देश  विदेश पातळी  जागतिक खोटे व्यवहार, महाकाय उत्पादक कंपन्याची भ्रष्ट्र नीती, अन्याय, अमेरिकेची मुजोरी, जनतेची फसवणूक   या  विरुद्ध अनेक पातळ्यावर लढा नेहमीच लढला जातो. नक्षलवादी,माओवादी ते लादेन यांनी प्रस्थापित शासनाच्या विरोधात  सशस्त्र , गामिनी लढा उभारला आहे. तो जायज का नजायज हा मुद्दा गौण आहे. जेंव्हा प्रस्थापित यंत्रणा अन्यायाची परिसीमा ओलांडते आणि या शासन संस्थे मध्ये आपणास न्याय


मिळणार नाही याची खात्री झाल्या वर  हे अन्यायग्रस्त  लोक मग हातात शस्त्र घेतात तो नाईलाजाने. यामुळे यांचे कांही फारसे चुकले असे म्हणता येणार नाही. आपल्या घरात सुरक्षित राहून या  अन्यायग्रस्तांचे दुख: वेदना आपणस समजणार नाही. यामुळे वेळोवेळी राज्य व्यवस्थे विरुद्ध उठाव होत असतात. जेंव्हा हे उठाव यशस्वी होतात तेंव्हा या उठावास क्रांती म्हणून उठाव करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर   म्हुणुन गौरवले जाते.हाच  उठाव अयशस्वी झाला तर देशद्रोही म्हणून त्यांच्या कपाळी शिक्का बसतो.                 
भ्रष्ट्राचाराच्या, अन्यायाच्या  विरुद्ध लढण्या साठी विकीलीक्स ने जगाला सायबर क्राईम हे नवीन हत्यार उपलब्ध करून दिले.
सायबर गुन्हा हा शासना विरुद्ध लढण्याचा अहिंसे पेक्षा हि प्रभावी मार्ग आहे. अहिंसेने जर शासन वठणीवर आले असते तर सायबर गुन्हा करण्याची गरजच पडणार नाही. अहिंसे ने भारताला स्वातंत्र्य मिळाले हा खोटा प्रचार कॉंग्रेस नेत्यांनी स्वतः च्या स्वार्था साठी केला. वस्तुतः दुसऱ्या महायुद्धात जिंकून ही इंग्लंड चे अतोनात नुकसान झाले.आणि दूरवर पसरलेल्या वसाहतींवर नियंत्रण करणे इंग्रजांना अवघड झाले.  दुसऱ्या महायुद्धाचा गड जिंकला पण  इंग्लंडला आपल्या वसाहतींवर पाणी सोडावे लागले . पण येथील  बेईमान राज्यकर्त्यांनी आमच्या मुळे गांधी मुळे स्वातंत्र्य मिळाले असा गोबेल्स टाईप प्रचार करत देशाला लुटण्याचे काम सुरु केले. नथूरामने गांधी ला फक्त एकदाच मारले पण हे गाँधी चे  अनुयायी त्याचे नाव   घेत रोज बेईमानी करत  भ्रष्ट्र कारभार करून त्याचा रोज खून करत आहे, हे जास्त धोकादायक आहे.  भारतीय जनतेला हे आता आता लक्षात येत आहे.  १०० कोटीच्या वर लोकसंख्या असलेल्या भारतीय  बाजारपेठेत आपल माल खपवण्या साठी पाशिमात्य देशांनी भारतीयांची  गांधी ,अहिंसा यावरील अंध भक्ती पाहून गांधी चा अहिंसेचा उदोउदो सुरु केला. आणि स्वतः च्या मंदीच्या गर्गेत सापडेलेल्या  अर्थ व्यवस्थेला सावरण्या साठी   भारताला शस्त्रे अणु तंत्रज्ञान विकण्यास सुरुवात केली.
  अमेरिका आणि पाशिमात्य देशातील महाकाय कंपन्या  ह्या  घातक शस्त्रे, बोंब याचे मोठे उत्पादन करतात.  मोठ्या प्रमाणात ही युद्ध सामुग्री जगभर  विकण्या करता या लोबीचे  अमेरिकन आणि पाशिमात्य सरकारवर दडपण असते.  या मुळे ही युद्ध सामुग्री विकण्या साठी जगात सतत युद्धे  चालू रहावीत या करता कट कारस्थान करत राहणे  हा या सरकारांचा  छुपा उद्योग जगभर या देशांच्या  वकिलाती मधून चालू असतो. अमेरिकेच्या दादागिरीला वेसन आज कोणता ही देश घालू शकत नाही. पण अमेरिका ला हरवता येते हे विएतनाम, क्युबा अफगाणिस्थान या देशांच्या उदाहरणावरून सिद्ध झाले. तरी पण या देशा ला समोर समोर आव्हान देण्या पेक्षा विकीलीक्स ने जो मार्ग दाखवला  तो फार महत्वपूर्ण आणि आपण ढोल  बडवत असलेल्या अहिंसेच्या मार्गा पेक्षा अधिक परिणामकारक आहे यात   शंकाच नाही.   

No comments: