विकीलीक्स ने जे गुप्त कागद पत्रे उघड केली हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे आहे असे म्हणत आज अमेरिका बोंब मारत आहे आणि ही साईट बंद करण्या करता आकाश पाताळ एक करत आहे.सर्व्हर कंपनीवर दबाब आणण्या पासून ते अनेक देशा वर जेथून ही साईट प्रसिद्ध होते त्यांना धमकावण्याचे प्रकार चालू केले. पण या साईट चे व्यवस्थापन अमेरिकेला पुरून उरले आहे.रोज नवीन बोंब फुटत आहेत जे अणुबॉम्ब पेक्षा भयानक संहारक आहेत. पण एक मात्र बरे आहे सामान्य जनतेच्या मालमत्तेचे,जीवाचे कांही नुकसान होत नाही. याबाबत दैनिक भास्कर या हिंदी वर्तमान पत्रात खूप माहिती आली आहे, http://www.bhaskar.com/ article/INT-indias-response- to-disclosures-mature-u- 1615928.html?HT1= ती वाचण्या सारखी आहे.
प्राचीन काळा पासून जगात लोकशाही कमी अधिक प्रमाणात अस्तिवात आहे. पण लोकशाही ची आधुनिक काळात खऱ्या अर्थाने सुरुवात अमेरिकेच्या स्वातंत्र लढ्या नंतर १८व्या शतकात झाली. पाव मिळत नसेल तर केक खा असे उद्दाम उत्तर जेंव्हा फ्रान्सच्या राणीने भुकेल्या फ्रांस च्या जनतेला दिले तेंव्हाच लोकशाहीच्या क्रांतीची ठिणगी जनतेच्या मनात पेटली आणि मग जगभर जुलमी राजेशाही विरुद्ध उठाव होत लोकशाही स्थापन झाली. आणि लिंकन यांनी म्हटल्या प्रमाणे government of the people, by the people, for the people” जनतेची जनते कडून जनते करता चालवली जाणारी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही.अशी शासन प्रणाली जगभरात अस्तिवात आली. नव्याचे नऊ दीवस लोकशाहीचे जगभर कोतूक झाले . दुसऱ्या महायुद्धा नंतर जगभरातील सत्ता समतोल अमेरिका आणि रशिया यांच्या कडे झुकला . युरोप आणि इंग्लंड चा स्वत: च्या अस्थित्वा साठी संघर्ष सुरु झाला. रशिया मध्ये हुकुमशाही असल्या मुळे तेथे काय चालले हे जगाला कळत नव्हते. अमेरिकेत आणि जगभरात लोकशाही होती पण सत्तेच्या आणि संपत्तीच्या हव्यासापायी लोकशाहीतील जन प्रतिनिधीचे रुपांतर हुकुमशहात होत गेले. त्यांना आपण केलेले काळे, भ्रष्ट्र व्यवहार जनते पासून लपवून ठेवणे आवश्यक झाले. आणि यातूनच सरकारी गोपनीयतेचा कायदा अंमलात आणला गेला. ज्या जनते करता ही शासन व्यवस्था निर्माण झाली तिलाच निर्णय प्रक्रियेतून डावलले गेले. अमेरिकन सरकार कंपन्यांच्या हातातील बाहुले बनले. त्यांच्या फायद्या साठी शासन काम करू लागले. जनतेस आवश्यक असलेली सरकारी आरोग्य सेवा पेशंट करता नाही तर या महाकाय ओषध निर्माण करणाऱ्या,मेडिकल विमा, कंपन्या आणि ओषध विक्रते यांच्या साठी राबवल्या जात होत्या . अमेरिकन कंपन्यांनी बनवलेली विनाशकारी अस्त्रे शस्त्रे दारुगोळा विकण्यासाठी अमेरिकन शासन जगाच्या विविध भागात सतत युद्धे चालू राहील असेच कारस्थान करू लागले.
आणि जगातील इतर लोकशाही देशांचे शासन आणि राजकारणी राज्यकर्ते जनते पेक्षा स्वतःहचा स्वार्थ साधण्यात मग्न झालेत. आणि लिंकन च्या लोकशाहीच्या व्याख्ये चे रुपांतर भ्रष्ट्र राज्यकर्त्यांचे भ्रष्ट्र राज्यकर्त्यांच्या भ्रष्ट्राचारा साठी फक्त जनते कडून निवडलेले शासन असे झाले. दिवसा काळा बाजारवाल्याना , भ्रष्ट्राचार्याना, मवाली, गुंड, स्मगलर यांना फाशी देण्याची भाषा करणारे रात्री यांच्या मैफिलीत नाच गाणे करू लागले. कारण यांचा काळा पैसा आणि दहशद निवडणुका जिकण्यास उपयोगी पडू लागले. निवडणुका जिंकण्या साठी जातपात धर्म पैसा दारू बाई यांचा सरास वापर सुरु झाला. सामान्य जनतेस निवडणुकीत उभे रहने तर दूर पण मतदान करणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यांच्या नावाचे बेकायदेशीर मतदान सकाळी मतदान केंद्र उघडल्या उघडल्या पोलीस पहाऱ्यात होवून जावू लागले जनता मतदान न करताच घरी परतत होती. जो जास्त गैरमार्ग वापरेल तो निवडून येत होता. सत्तेत येताच निवडणूक खर्च भरून काढण्या साठी आणि पुढील निवडणूक खर्चा साठी भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात करणे भाग होते.
आणि हे सर्व शासकीय गोपनीयतेच्या नावा खाली दडपले जावू लागले. लवकरच गुंड,मवाली लोकांना आपले निवडणुकीतील महत्व आणि राजकारण्यांचे दुपट्टी वागणे लक्षात आले . त्यांची महत्वकांक्षा वाढली ते स्वत; निवडणुकीत उतरू लागले आणि हे बाहुबली स्वत:च राज्यकर्ते झाले.कोणता ही पक्ष याला अपवाद नव्हता .. याचा व्हायचा तो दुष्परिणाम जनतेवर पडू लागला. पैश्याच्या जोरावर मिडिया सुद्धा या लुबाडणाऱ्या टोळ्यात सामील झाला. वर्तमान पत्रवाले सरास पैसे घेवून या लोकांच्या स्वार्थाच्याच बातम्या छापू लागले. जनतेने विचार करू नये म्हणून जनतेला इडीयट box आणि क्रिकेट च्या नशेत गुंगवून ठेवण्याचे कट कारस्थान राजकारण्यांनी सुरु केले. सामने FIX केले जावू लागले क्रिकेटच्या जय-पराजयाचा संबंध देशभावनेशी जोडला गेला.
जनतेला शिक्षणा पासून जाणूनबुजून दूर ठेवण्याचे प्रयत्न करत धर्माV/Sधर्मात, भाषेत, राज्याराज्यात , जाती जाती मध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान पद्धतशीर केले गेले. राज्येशाही जावून हे नवीन भक्षक लोकसेवक जनसेवक च्या रुपात निर्माण झाले. पण कोंबड कितीही झाकून ठेवलं तरी ज्या प्रमाणे सूर्य उगवायचा राहत नाही तसेच ज्ञानाच्या सुर्योदया मुळे आणि संगणक क्रांती मुळे जनतेला वास्तव कळण्यास सुरुवात झाली आहे. त्याच बरोबर या लोकनेत्यांचे काळे चेहरे ही उघड होवू लागले............cont..

No comments:
Post a Comment