Translate

Wednesday, December 1, 2010

ठणठणपाळ उवाच !! ठणठणपाळ उवाच !!

कोकण किनाऱ्यावरील जैतापूर नागरी अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने फ्रान्सचे अध्यक्ष निकोल्स सार्कोझी यांच्या आगामी भारत दौऱ्यात पुढचे पाऊल पडणार असून, "त्या संदर्भात समझोत्यावर स्वाक्षऱ्या होतील,
ठणठणपाळ उवाच :-फ्रान्सचे अध्यक्ष निकोल्स सार्कोझी यांच्या आगामी भारत दौऱ्यात जैतापूर प्रकल्प- करार होणार, अमेरिकन अध्यक्ष भारत दोऱ्यावर येण्या आधी अणुकराराच्या सर्व अटी मान्य करत ओबामांच्या भेटीत अणुकरार सह्या . या सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवरून हे भारत सरकार भारतीय जनते करता काम करत आहे का आंतरराष्ट्रीय कंपन्यान चे दलाल म्हणून काम करत आहे हा प्रश्न निर्माण होतो. 
नवी दिल्ली- "मालन्यूट्रिशन'ला हिंदीत काय म्हणतात...? कुपोषणविरोधी मोहिमेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून झेंडा खांद्यावर घ्यायला आलेल्या आमीर खानला पहिल्याच दिवशी प्रश्‍न पडला. संसदेबाहेर आमीरच्या या प्रश्‍नाने कुपोषणविरोधी मोहिमेचे कुपोषण होते की काय, अशी शंकेची पाल उपस्थितांच्या मनात चुकचुकली.
ठणठणपाळ उवाच :-कुपोषणविरोधी मोहिमेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून अभय बंग आणि राणी बंग या डॉक्टर दांपत्य यांच्या शिवाय दुसरा कोणी योग्य नाही. पण आपले नौटंकी राजकारणी सरकार यांचा काम करण्या पेक्षा नौटंकी करणाऱ्यावरच जास्त भर असल्यामुळे तद्दन फिल्मी नट नट्यांना राजदूत म्हणून नेमून संसदेत हि तमाशा केला जातो आणि या बाजारू संस्कृती मुळे चांगल्या  योजनेचे हसे होते ते वेगळे.
आयडॉल्सना 'रेस' भोवली! 
ठणठणपाळ उवाच :-हे आमचे नकली आयडॉल्स ज्यांना आम्ही मुर्खा सारखे डोक्यावर घेवून नाचतो. योगायोगाने किंवा अचानक मिळालेले यश पचवण्याची ताकद असावी लागते. नाही तर गाढवाने वाघाचे कातडे पांघरले तरि गाढव हे गाढवच राहते अशी गत होण्यास वेळ लागत नाही.



No comments: