शोध पत्रकारीता हा प्रकार आजच्या बाजारू वर्तमानपत्राच्या जगात जवळपास नष्ट झाल्यातच जमा झाला आहे. आज वर्तमान पत्रातील बातम्यावर लहान पोर ही विश्वास ठेवत नाही. कारण प्रत्येक बातमी ही जवळपास पैसा देवूनच छापून आणावी लागते हे कटू सत्य आहे. आणि आजच्या वर्तमान पत्रात माजी मुख्यमंत्र्याच्या शब्दात सांगायचे तर विकतची बातमी छापून आणण्याची कुवत फक्त राजकारणी, बिल्डर आणि काळा धंदा करणाऱ्याचीच आहे. ती सामान्य माणूस आणि समाज सेवा करणाऱ्यात नाही.
म्हणूनच जेंव्हा विकीलीक्स सारखे माध्यम नेट वरून अमेरिकेचा त्याच्या दुपट्टी वागण्याचा दहशदवादाचा सभ्य बुरखा लाखो सरकारी गुपित कागद पत्रे जीवाची पर्वा न करता प्रसिद्ध करत टराटरा फाडते तेंव्हा साहजिकच त्या माणसाला प्रणाम करावे लागते.
अमेरिके सारख्या बलाढ्य सत्तेशी आज युद्ध करण्याची कोणाची ताकद नाही. पण त्याच बरोबर अमेरिका आणि त्याच्या महाकाय कंपन्यांना जगातील सर्वजण त्रासून गेले आहे, हे उघड बोलण्याची त्यांच्याशी सामना करण्याची हिम्मत कोणी करत नाही. आणि जर त्यांना विरोध झालाच तर साम, दाम, भेद दंड करून त्याला जगातून नाहीसा करण्याचे कट कारस्थान अमेरिकन सरकार आणि या महाकाय कंपन्या अमेरिकन गुप्तहेर संघटना तसेच जगभरात असलेल्या अमेरिकन राजकीय दुतवासाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करत असतात याला अमेरिकन अध्यक्ष सुद्धा बळी पडले आहेत . यांना पुरून उरला तो फक्त A revolution is not a bed of roses. म्हणणारा फिडेल केस्ट्रो क्युबा , अमेरिकन गुप्तहेर संघटनेने याला मारण्यासाठी शेकडो वेळा प्रयत्न केले पण तो यांना पुरून उरला आणि आज त्या संघटने सुद्धा हे केलेले कट कारस्थाना चे प्रयत्न मोजण्याचे सोडून दिले आहे.
आज अमेरिकेला हारवण्या साठी प्रत्यक्ष युद्ध न करता त्याच्यावर दहशदवादी हल्ले करण्याचे आणि त्यास धडा शिकवण्याचे तंत्र आणि मंत्र त्याच्या शत्रूंनी अवलबंण्यास सुरुवात केली आहे. जे शिवाजी महाराजांनी ४०० वर्षा पूर्वी महाराष्ट्रात मोगलांना हरवण्या साठी वापरून औरंगजेबला येथेच प्राण ठेवण्यास मजबूर केले.
11/09/2001 च्या आंतकी हल्ल्यातून अमेरिका सावरत असतानाच हा सरकारी बेईमानीची गुपित माहिती उघड करण्याचा हल्ला अमेरिकेवर झाला. यावरून माहितीच्या अधिकाराचे महत्व किती मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात येते. या हल्ल्यात संपूर्ण अमेरिकन सरकारच जायबंदी झाले आहे. संगणक क्रांती मुळे सरकारी फाईली मधून बाहेर पडलेले हे माहितीचे भूत आता अमेरिकन दहशदवादाच्या मुळावरच घाव घालत आहे. या हल्ल्याला कसे सामोरे जावे, याचा कसा प्रतिकार करावा असा संभ्रम अमेरिकन सरकारला पडला , आणि यातूनच हा हल्ला सर्व जगभरावर आहे म्हणत नेहमी प्रमाणे हा सर्व जगाचा प्रश्न आहे म्हणत गोबेल्स ला लाजवेल असा प्रचार अमेरिकेने सुरु केला.

सरकारी गुपित माहिती उघड करणे हे नैतिक नाही अशी भलावण हे अनैतिक शासन करत आहे. बेईमानी करत भ्रष्ट्राचार करत स्वतः च्या स्वार्था साठी जगाला वेठीस धरत असताना, तेंव्हा कोठे गेला होता अमेरीकानसुता तुझा धर्म ? असा प्रश्न विचारावासा वाटतो.हे माहिती उघड करणे नैतिक का अनैतिक त्या बद्दल पुढील भागात चर्चा करुत.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:- http://www.thanthanpal.blogspot.com
Thanthanpal,
Always visit:- http://www.thanthanpal.blogspot.com
No comments:
Post a Comment