Translate

Sunday, September 26, 2010

प्रदूषणा चा विचार कोणत्याही प्रचंड संपत्ती जमा करणाऱ्या गणपती मंडळानी केला नाही.

गणपती उत्सव उत्साहात पार पडला . करोडोची माया गणपती मंडळानी जमा केली. ही संपत्ती कमी वाटली म्हणून की काय अजून जास्त पैसा जमा व्हावा म्हणून भक्तांनी देवाला अर्पण केलेल्या दागदागिन्यांचा जाहीर लिलाव मांडून अजून जास्त संपत्ती निर्माण केली .
लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण केलेल्या अनेक मौल्यवान वस्तूंची गेले दोन दिवस मोजदाद सुरू आहे. कुबेराचा खजिनाही फिका पडावा इतक्या सोन्या-चांदीच्या वस्तू लालबागच्या राजाच्या दरबारात जमा.अनेक ठिकाणी, निवासी वसतीत असलेला पन्ननास डेसिबलचा नियम तर धाब्यावर बसवताना आवाजाची पातळी १०० डेसिबल्स होती.



काही ठिकाणी तर बाप्पाची मिरवणूक काढताना मध्यरात्रीही फटाके आणि , अॅॅटमबाँब फोडले गेले, परंतु पोलिसांनी तिकडे दुर्लक्ष केले असा स्थानिकांचा आरोप आहे, मिरवणुकीत वाजणारा बँडही असह्य होता असेही लोकांनी सांगितले. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून रात्री बारानंतरही डॉल्बी सिस्टीमवरील कर्णकर्कश आवाजातील गाण्यांच्या तालावर हजारो तरुण खासदार उदयन राजेंच्या इशाऱ्यावर नाचत होते. न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाबाबत कार्यकर्त्यांनी विचारणा करताच, इथं मीच कोर्ट आहे. भिऊ नका.हृदयात धडकी बसविणारा डॉल्बीचा ठणठणाट, ढोल-ताशांचा गजर आणि थिरकणारी तरुणाई अशा जल्लोषी वातावरणात गुरुवारी सकाळी ७ वाजता कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीची सांगता झाली. तब्बल २२ तासांहून अधिक काळ चाललेल्या या मिरवणुकीदरम्यान मुख्य मार्गावर डॉल्बीच्या हादऱ्याने एका इमारतीची गॅलरी कोसळल्याने झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले. यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर असून मिरवणुकीतील गोंधळ आवरण्यासाठी पोलिसांना दोन वेळा लाठीमाराचा आधारही घ्यावा लागला.
पण या १०-१२ दिवसात या मंडळान कडून जी पर्यावरणाची हानी झाली, प्रचंड आवाजांनी जनतेला त्रास झाला, गर्दीचा त्रास तर नेहमीच नशिबी असतो .विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बाप्पा बरोबर गवत,फुल, निर्माल्य अजून अनेक वस्तू मुंबईत समुद्रात, इतर ठिकाणी नदीत टाकण्यात आल्या. त्या मुळे होणाऱ्या पर्यावरण नाशाचा , प्रदूषणा चा विचार कोणत्याही प्रचंड संपत्ती जमा करणाऱ्या गणपती मंडळानी केला नाही. एकट्या मुंबईतच ३०००-४००० ट्रक्स कचरा विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक जबाबदारीच्या भावनेने महानगर पालिकेच्या मदतीने साफसूफ केला. तर संपूर्ण महाराष्ट्रात किती कचरा नद्यात, विहरीत पिण्याच्या पाण्यात मिसळला गेला असेल ?
गणपती मंडळे भक्तांच्या भावनेचा जाहीर लिलाव बाजार मांडून करोडोंची संपत्ती जमा करतात त्यांनी हा सर्व कचरा साफ करण्याचा प्रयत्न का करू नये? जमा झालेल्या संपत्ती मधून ठराविक पैसा या कामाला देण्याचे कायद्याने बंधनकारक करण्यात का येवू नये? कांही मंडळे अश्या कामात मदत करत असतील तर त्यांची नावे जाहीर करावी. आणि या सर्व सणांना साजरा करण्या करता याचा जनतेला कमीतकमी त्रास होईल अशी नियमावली, कायदे करावेत.

No comments: