Translate

Sunday, September 19, 2010

रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.


'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही रस्त्याची अवस्था वाईट असल्याचेही मान्य केले.





रस्त्यांची स्थिती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी कोर्टाने मॉनिटरिंग कमिटी स्थापन केलीय. माजी पोलिस आयुक्त रॉनी मेन्डोन्सा, पालिकेचे माजी चीफ इंजिनिअर नंदकुमार साळवी, आयआयटीचे सुधीर बदामी, अॅडव्होकेट मिहिर देसाई आणि 'अग्नि'चे गर्सन डिकुन्हा या पाच जणांची कमिटी स्थापन केली आहे. रस्त्यांची स्थिती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी कोर्टाने मॉनिटरिंग कमिटी स्थापन केलीय. माजी पोलिस आयुक्त रॉनी मेन्डोन्सा, पालिकेचे माजी चीफ इंजिनिअर नंदकुमार साळवी, आयआयटीचे सुधीर बदामी, अॅडव्होकेट मिहिर देसाई आणि 'अग्नि'चे गर्सन डिकुन्हा या पाच जणांची कमिटी

मुंबईतील रस्त्यांची लांबी १९४० किलोमीटर आहे. यापैकी किमान ३५० किलोमीटरचे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. इतर रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेतच. आधीच खड्डयांनी हाडे शेकून निघालेल्या मुंबईकरांचे संकट अधिकच वाढले आहे. नुकत्याच पडलेल्या पावसाने गेल्या दहा दिवसात १६२४ नवीन खड्ड्यांची भर पडली आहे.   रस्त्याचे काम करीत असताना तांत्रिक बाबींचे पालन होत नसल्याचे रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेतून स्पष्ट होते. तज्ज्ञांच्या मतानुसार रस्ते तयार करताना डांबर आणि खडीचे योग्य मिश्रण नसेल तर रस्ते खराब होऊ शकतात. ब्रिटिशकालीन कंपन्या शंभर वर्षांची खात्री देऊन रस्ते, पुलांची बांधणी करीत होते. तेवढ्या कालावधीपर्यंत ती बांधकामे टिकाव धरतात. अशी अनेक उदाहरणे आजही जिल्ह्यात पाहायला मिळतात; मात्र सध्याच्या बांधकाम विभागाचे कंत्राटदारांवर नियंत्रण नसल्याने तसेच रस्ते पाहणी समितीचेही दुर्लक्ष होत असल्याने महामार्ग दुरवस्थेच्या विळख्यात सापडला आहे. पालिका दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करते; परंतु रस्त्यांची सुधारणा होत नाही.
अवघ्या आठ दिवसांवर गणशोत्सव येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव साजरा करताना रस्त्यांवरील खड्ड्यांचा अडथळा त्यात प्रामुख्याने मोठा आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ते दुरुस्त होत नसल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी आज प्रशासनाचे वाभाडे काढले. पावसाची उघडीप मिळताच रस्त्यांची दुरुस्ती झपाट्याने करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करू, अशी ग्वाही प्रशासनाने दिली. 

रस्त्यात खड्डे होतातच कसे? अश्या निकृष्ट रस्ते बांधणी करणाऱ्या वर तुम्ही साफ असलात तर  खटले का भरत नाही? अश्या खराब बांधकाम करणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करा. स्वच्छ प्रशासन करा मग बघा रस्ते कसे चांगले तय्यार होतात का नाही ते. आज टेंडरच्या किमती पैकी ४०% लाच देण्यात गुत्तेदार खर्च करतात २०% त्याचा फायदा .बांधकामावर फक्त ४०% खर्च होतात. मग रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही. उगाच वेड पांघरून पेडगावला जाण्याचे नाटक करतात . अमेरिका विकसित आहे म्हणून तेथील रस्ते चांगले आहेत असे नव्हे तर चांगल्या रस्त्या मुळे अमेरिकेचा विकास झाला हे खुद अमेरिकन अध्यक्षाचे मत आहे.
http://www.artba.org/about/faqs-transportation--general-public/faqs/#1 या अमेरिका रोड या साईट वर रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे .फक्त इच्छाशक्ती पाहिजे.
building a better America through transportation construction हे  त्यांचे ब्रीद वाक्य आहे.
आपण अमेरिकेचा फक्त चंगळवाद घेतला त्यांची मेहनत, चांगले काम लगन घेतली नाही .



No comments: