Translate

Monday, September 6, 2010

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी  कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे.  मराठी माणसा करता बरोबरीने काम करावे म्हणून  आज मुंबईत मूक मोर्चा दोघांच्या घरावर काढला..... या प्रयत्नाची दोघानाही कित्येक दीवस आधी कल्पना देण्यात आली होती. पण दोन मराठी माणस एकत्र येतील ते कसले मराठी या उक्तीनुसार आज या दोघांचे वागणे होते. 


आधी माहित असूनही राज ने घरी न थांबून  जनतेला भेटण्याचे  साधे सोजन्य सुद्धा दाखवले नाही तर उद्धवने  भेटण्याचे सोजन्य   दाखवत जनतेला असले मोर्चे  काढून वेळ खराब करू नका म्हणत सर्वानीच शिवसेनेत यावे असे आवाहन करत मनोमिलन अश्यक्य असल्याचे सांगत त्यांना कोणाची गरज नाही असे ठणकावले.  यावरून या दोघांना मराठीभाषा आणि मराठी माणसाच्या भल्या बद्दल किती प्रेम आहे हे दिसून आले.   

मराठी माणसा आता तरी जागा हो! या दोघांना हि मराठीचे जे प्रेम आहे ते पुतना मावशीचे प्रेम आहे. मराठीच्या राजकारणावर या दोघांना स्वत:ची राजकारणाची दुकानदारी चालवायची आहे. एकदा महानगर पालिकेची निवडणूक येवू द्या मग पहा हे दोन बोके कोणाच्या ही मध्यस्थी शिवाय कसे  एकत्र येतात ते? आणि नाही आले तरी निवडणुका झाल्यावर सत्तासुंदरी साठी  जागा कमी पडू लागल्यावर हेच दोघे बोके सत्तेचे लोणी खाण्या साठी कसेही करून एकत्र येतील. आणि मराठी, मुंबईकरांच्या भल्या साठी आम्ही यापुढे एकत्र सत्ता राबवूत (वाटून खावू) ,अशी मानभावी घोषणा करतील . मराठी माणसाला मूर्ख बनवत मुंबई महानगर पालिकेचे भूखंड ओरपत आता मराठी माणसाचे अस्तिव असलेल्या  डोंबिवली मधून सुद्धा मराठी माणसाची हक्कलपट्टी थेट कसारा कर्जत घाटाच्या पलीकडे करून डोंबिवली चे पवई, लावासा सारखे मेक-ओवर करण्यासाठी हिरानंदानी , हिराचंद या सारख्या बिल्डरांना आंदण म्हणून दिल्या जाईल. आणि मराठी माणूस रेल्वे च्या डब्ब्याला लटकत ६-७ घंट्या चा प्रवास करत त्यांची चाकरी करेल. मग परत बेळगाव महाराष्ट्रात घेणारच म्हणत नार्काश्रू ढाळत जय महाराष्ट्र !! जय मराठी भाषा !!  आहेच . 
जाता जाता. बांद्रा पश्चिम रेल्वे स्टेशन समोरची अवघ्या ३०-३५ वर्षा ची  सहकारी भांडार असलेले भक्कम इमारत पडण्याच्या अवस्थ्ये मध्ये असून ही इमारत त्वरित खाली करण्याची भाडेकरूना नोटीसी देवून ती मोक्याची जागा बिल्डर्स च्या घश्यात घालण्याचा मुंबई महानगर पालिकेच्या अधिकरत्यांचा (प्रशासकीय आणि राजकारणी) लीकांचा डाव तेथील एका भाडेकरुनी माहितीचा अधिकार वापरून हाणून पडला . माहिती मागताच प्रशासनाने आपला निर्णय फिरवत नोटीसा मागे घेतल्या. या संदर्भात वार्ताहरानी महापोराना विचारले असता असे प्रकार मुंबईत घडत आहे हे मान्य करत जनतेने आम्हाला याची माहिती द्यावी असे मानभावीपणाने आवाहन केले.

No comments: