आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही? तर आजच्या वर्तमान पुढील पत्रातील बातम्या वाचा. वर आस्मान कधी नव्हे तर याच वेळी फाटले . गंगा , यमुना नद्यांनी गेल्या पन्नास वर्षात आपली सीमा कधी ही ओलांडली नव्हती त्या नद्या शहरेच्या शहरे मंदिर मस्जिद उध्वस्त करत बेफामपणे वाहत आहेत भारताच्या खेळाच्या तय्यारीचे त्यांना कांही भान आहे का? हा प्रश्न पडतो. पण गेल्या महिन्या पासून या दोघांनी ही महान भारताच्या यशावर पाणी फिरवण्याचे कार्य अविरत केले . देशाची इभ्रत पणाला लावणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा दोनच आठवड्यावर येऊन ठेपल्या असताना सोमवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर, याच स्पर्धांच्या निमित्ताने उभारला जात असलेला पादचारी पूल कोसळून २३ मजूर जखमी झाले आणि देशाची लाज गेली.राष्ट्रकुल खेळांचे उद्धाटन समारंभ तसंच समारोप समारंभ होणा-या जवाहरलाल नेहरु मैदानाजवळच हा पूल आहे. या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना म्हणजे शरमेची बाब असल्याचे जनतेचे मत आहे.वेलिंग्टन - राष्ट्रकुल क्रीडानगरीतील प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच दिल्लीत सातत्याने येत असलेल्या पुरामुळे वेगाने होत असलेल्या कामावर प्रतिकूल परिणामही होत आहे. आता यात सुधारणा झाली नाही, तर स्पर्धाच रद्द होईल, असे न्यूझीलंडचे पथकप्रमुख डेव्ह करी यांनी सांगत राष्ट्रकुल संयोजकांची झोप उडवली पण आपल्या कलमाडी अन्ड कंपनीने याला न भिता भारताची मान , शान जगभर उंचावण्या प्रयत्न चालू ठेवले यास दाद द्यायला पाहिजे. आज त्यांच्या जागी दुसरे कोणी असते आणि भारता शिवाय दुसरा देश असता तर कधीच स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करून बसला असता.
पण नाक काटले तरी दोन भोक शिल्लक आहेत याचा ज्या प्रमाणे अभिमान बाळगणारे असतात त्याच प्रमाणे खेळ नगरीत घाण , अस्वच्छता , मच्छर असले तरी काय झाले आम्ही प्रचंड बांधकाम तर केले. हं आता नवीन बांधकाम झाल्यावर जागेवर मलवा सामानाचा कचरा तर पडणारच. नागरिकाने घर बांधले तर त्यास हा अनुभव येतोच मग खेलग्राम येथे घाण कचरा साचला ही ओरड चूक आहे हे फक्त , राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा प्रमुखच म्हणू शकतो. आणि केलेल्या कामाचे श्रेय घेवू शकतो.
२ वर्ष बांधकाम चालू असलेला नेहरू स्टेडीयम ला जाणारा पूल काल अचानक तुटला . माध्यमांनी प्रचंड गोंधळ घातला . असा गोंधळ घातल्याने देशाची नाचक्की होते हे या मिडिया वाल्यांना कोणी तरी सांगून त्यांच्या स्वातंत्र्यावर देशाच्या मान सन्माना साठी नियंत्रण घालणे आवश्यक आहे. आता आम्ही राहिलेल्या १२ दिवसात हा पूल पुन्हा उभा करत आहोत हे या खेलग्राम आणि देल्ही PWD इजिनिअर चा आत्मविश्वास तुम्हा आम्हा भारतीयात कधी येणार देव जाणे. दोन वर्षा पासून हा पूल बांधण्यात येत असताना तो तुम्ही नीट बांधला नाही , हा पत्रकारांचा पश्न आमच्या काबिलते वर अविश्वास दाखवणारा आहे. कोठे तरी एखादी पिन ढिली राहेली असेल म्हणून पूल कोसळला हे PWD इजिनिअर चे म्हणणे मान्य केले तर बाकी पूल चांगला नवीन डिझाइन चा होता त्यात खराबी नव्हती हे तर मान्य करा.
अश्या प्रकारे ब्रिटीश साम्राज्याच्या गुलाम राष्ट्रांचे १९३० मध्ये खेळ सुरु झाल्या पासून आज पर्यंत कोणास ही न मिळालेली गलथान कारभाराचे, अस्वच्छतेचे, भ्रष्ट्राचाराचे, खराब बांधकामाचे डोपिंगची सुवर्ण , रोप्प्य , ब्राझ पदके सर्वच्या सर्व भारताने स्पर्धा सुरु होण्या आधीच पटकाविली हा एक जागतिक ओलम्पिक विक्रम आहे. त्या करता भारताच्या महासत्तेचा ढोल बडवणाऱ्या मनमोहनच्या हस्ते आणि त्यास साथ देणाऱ्या अमेरिकन अध्यक्ष ओबामांच्या अध्यक्षते खाली एका खास समारंभात सुरेश कलमाडी ,शीला दीक्षित या दोघांचा विश्वखेळरत्न (अविश्वासू कोण कुजबुजते रे मणि अय्यर ? ) हा जगातील एकमेव जागतिक पुरस्कार देवून जागतिक गोरव करण्यात येणार आहे. पुण्याच्या ओसाड बालेवाडीच्या खेळ नगरीत हा भव्य,दिव्य नेत्रसुख आकाशातील रंगीबेरंगी रोषणाई, आणि फटक्याच्या आतिशबाजीने हा सोहळा कलमाडी स्टाईल रंगणार आहे.
No comments:
Post a Comment