Translate

Sunday, September 5, 2010

मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले

शाळांना दहा दिवस सुटी
दिवाळी, ख्रिसमस म्हटला की, शाळांना सुटी असते. परंतु शेगावच्या इतिहासात प्रथमच दिवाळी, उन्हाळ्याच्या सुटीनंतर दहा दिवस शाळांना सुटी राहणार आहे. उत्सवादरम्यान नगरपालिकेच्या शाळा, कॉलेज बंद राहतील. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांचा निवास व्यवस्था म्हणून उपयोग करण्यात येणार आहे.
शाळांना दहा दिवस सुटी शिक्षणाची ऐसी कि तेसी. .नाहीतरी शिक्षणाचे महत्व आहे कोणाला. मंदिरे बांधा, उत्सव साजरे करा , अंधश्रद्धा पसरवा , नवसाला देव पावतो म्हणाव मग पहा पैसा कसा धो धो वाहतो. या पैश्यातून साम्राज्ये उभी करा आणि बिन परीक्षा घेता पदव्याची खिरापत वाटा. हीच तरुण पिढी जय हो!! जय हो


 !! करता वापरा . मजेत राहा. महारांजाची परदेशी वारी करा परदेशातील भाविकांचे हि भले होईल. अखिल भारतीय बाबा महासंघ स्थापन करून प्रत्येक गावागावात तील असे महाराज संत बाबा हुडकून त्यांची शासकीय जागेवर मंदिरे " बांधा वापरा आणि उपभोग घ्या" या तत्वावर उभी करा . प्रत्येक सेवेचे व्यापारीकरण करून सेवा मूल्य, देणग्या गोळा करा. हं महत्वाचे बाबांच्या चमत्कारांच्या TV सिरीयल काढा. मग बघा भाविक भक्तीच्या नशेत चूर होवून कसे भारावून जावून तुमच्या चरणी लीन होतील ठणठणपाळ च्या ठणठणा कडे लक्ष देवू नका.माझ्या मना बन दगड व्हा
मराठी शाळांना परवानगी न देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करून मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. हजारो विद्यार्थी पालकांसह स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी १९ जूनच्या परिपत्रकाची राज्यभर होळी केली आणि मराठी माध्यमातून शिकण्याच्या मूलभूत हक्कासाठी रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले.
गेल्या आठवड्या पासून हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठींब्या शिवाय गाजत आहे. आता आपणच लढा दिल्या शिवाय मराठीची अवेहलाना थांबणार नाही हे जेंव्हा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या लक्षात आले तेंव्हा सर्व शिक्षण प्रेमींनी एकत्रित येवून स्वतः:च आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षा कडे पाठिंब्याची भिक न मागता स्वबळावर लढविण्याचे ठरविले. महाराष्ट्रा मध्ये मराठीचा मुद्दा वापरून अनेकांचे महाल राजवाडे , गढ बांधून झाले आहे,पण मराठीची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस खालावतच आहे. आधी ती राजदरबारा बाहेर फाटकी वस्त्रे घालून उभी तरी होती. या राजकीय आंदोलनां मुळे तीला नवीन वस्त्रे मिळण्या ऐवजी तीला अजून कसे निवस्त्र केले जाईल याचा महाराष्ट्रातील शिक्षण खात्याने चंगच बांधला. आणि त्यातून त्यांनी एक अजब फतवा काढून मराठी शाळांना परवानगी नाही असे फर्मान काढले एवढेच नव्हे तर राज्यात हजारो विना परवाना चालणाऱ्या इंग्रजी शाळांना आळा घालण्या ऐवजी मराठी शाळा चालवल्या तर रुपये एक लाख दंड आणि तरीही बंद नाही केल्या तर रोज रुपये दहा हजार दंड आकाराला जाईल अशी धमकी दिली . यावेळी मराठीच्या तव्यावर लोणकढी साजूक बेळगावी तूप घालून पुरणपोळी उत्सव साजरा करत ढेकर देणारे आणि आमची जगात कोठेही शाखा नाही म्हणत मराठीचे खरेखुरे कैवारी आम्हीच आहोत अशी वाघ की सिंह गर्जना करणारे या फतव्याशी आपला जणू कांही संबंध नाही अश्या वृतीने आपआपल्या गुहेत घोरत पडले होते. कारण बहुतेक बहुसंख्य विनापरवाना चालणाऱ्या इंग्रजी शाळां बरोबर यांचे जाणता राजाच्या शब्दात सांगायचे झाले तर तोडपाणी झालेले असेल .
अखेर मराठी शिक्षण प्रेमी जनतेनेच स्वत: च आवाज उठवला हे बरे झाले. आपणही यात सामील होवू या !!

No comments: