Translate

Wednesday, September 1, 2010

हे फक्त भारतातच होवू शकते

दोन दिवसा पासून वर्तमानपत्रात TV वर आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन ह्यांनी मुंबईच्या विकासात अडथळा करण्यास सुरवात केली आहे .स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन यांनीही मुंबईतील पायाभूत विकासाच्या कामात अडसर उभा करण्यास सुरुवात केली आहे . अमिताभनी चारकोप - मानखुर्द व्हाया जुहू या प्रस्तावित मेट्रो रेल्वेमार्गाबाबत नाराजीचा सूर लावला आहे . जुहू येथील ' प्रतीक्षा ' बंगल्याजवळून हा मार्ग जाणार असल्याने सदर प्रकल्पामुळे आपली ' प्रायव्हसी ' संपुष्टात येईल , याची काळजी अमिताभना लागली आहे हे वाचून या कलाकारांवर जनतेने एव्हढे प्रेम केले , मानसन्मान दिला, पैसा प्रतिष्ठा दिली त्या कलाकारांची जनते बद्दल समाजा बद्दल कांही बांधिलकी आहे की नाही ? आज मुंबईच्या समस्या बच्चन यांना माहित नाही का? मध्यंतरी मंगेशकर भगिनींनी सुद्धा अशीच भूमिका घेवून पेडर रोड वरील उड्डाण पुलाचे काम रोकले होते. इतके दीवस राजकारणी लोक स्वार्था साठी शासकीय योजनांना अडथळा आणत होते, आता त्यात सेलिब्रेटिसज ची भर पाडली तर जनतेने काय करावे .सामान्य जनतेच्या घरावर नांगर फिरवून त्यातून उभ्या राहिलेल्या सुखसोयीचा आपण वापर करायचा .आणि आपल्यावर थोडी अडचण सहन करण्याची वेळ आली तर गळा काढायचा . हे फक्त भारतातच होवू शकते

No comments: