Translate

Thursday, February 7, 2013

माझ्या देशाचे सर्व नेते सुद्धा महान आहेत......




रोज सकाळी उठल्या बरोबर FB वर शासन आणि राजकीय नेत्यांच्या विरोधी टिपण्णी करून सरकारचा नौकारशाही चा राग ओढून घेण्या पेक्षा FB वर आज मी देशच्या महानतेच्या बाबी मित्राना शेअर करणार आहे .
माझा देश महानतम महान आहे. माझ्या देशाचे सर्व नेते सुद्धा महान आहेत.

ते सर्व एक पत्नी , सत्यवचनी आहेत. सर्व भारतीय माझे बांधव आहे यावर त्यांची निष्ठा असल्या मुळे परस्त्री,बाटली दारू या पासून ते चार हात दूरच राहतात,

बेईमानी, भ्रष्ट्राचार हे शब्दच त्यांच्या शब्दकोषात नाही , या मुळे ते भ्रष्ट्र बेईमान असणे शक्यच नाही. हे सर्व नेते पापभीरू असल्या मुळे ते कोणत्या ही प्रकारचे पाप करणे शक्यच नाही. काया वाच्या मनाने ते स्वच्छ आहेत.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रजातंत्र असलेल्या जनतेचे ते निवडून आलेले प्रतिनिधी असल्या मुळे दिनरात ते जनतेच्या सेवेत मग्न असतात.


बिना सहकार नही उद्धार या वर या नेत्यांची अविचल निष्टा असल्यामुळे निवडणुकीत बहुमत मिळालेले नसताना ही केवळ जनतेच्या सेवे साठी, ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या विरोधकांशी आघाडी करून सरकार स्थापन करतात. आणि जनतेची सेवा करतात. अश्या आघाड्या करताना केवळ जनसेवे साठी मनस्ताप होत असताना सुद्धा आपल्या तत्वाना ते सोडचिठी देतात. या वरून त्यांची महानता लक्षात येते.

लोकशाही राजा हा उपभोगशून्य राज्यकर्ता असतो या वचना प्रमाणे ते विविध सहकारी सोसायट्या संस्था , सहकारी बँका , सहकारी साखर कारखाने, सुत गिरण्या यांच्या संचालक मंडळावर काम करतात..... देश्यातील वाढणारया तरुणांच्या बेकारी च्या चिंते पोटी या सहकारात त्यांनी आपल्या कार्यकर्त्याना ही कामे दिली. या वरून देशाच्या तरुणांची त्याना किती काळजी वाटते हे लक्षात येते.

देशातील अशिक्षित जनतेला शिक्षण देण्या साठी या नेत्यांनी अनेक गैरसोयी असताना सुद्धा मोठमोठ्या शिक्षण संस्था शिक्षणाच्या कोणत्या ही सुविधा नसताना खेडोपाडी उभ्या केल्या. उच्च शिक्षण हे केवळ उच्च गुणवत्ता धारकांची मक्तेदारी होऊ नये म्हणून कमी मार्क्स गुण असलेल्या विद्यार्थ्याना ही डॉक्टर, इंजिनिअर MBA शाखेत प्रवेश उपलब्ध करून दिला. या वरून समाजातील तळा गाळा तील जनतेची त्याना कीती काळजी आहे हे लक्षात येते .

सत्तेमुळे आलेले दुखः , दर्द , यातना मनातच ठेवत , रात्री अंधारात एकांतात रडतात पण केवळ जनतेच्या प्रेमा मुळे , काळजी मुळे ते सत्ता राबवत असतात आणि हे दुखः यातना जनतेला होऊ नये म्हणून आपल्याच वारसदाराना मुलांना, नातवंडाना सत्ते वर बसवून जनसेवा करण्यास भाग पडतात. त्याना रडवतात .

No comments: