Translate

Saturday, February 9, 2013

अऱ अऱ आर. आर. आबा आता तरी थांबा ना .....

अऱ अऱ  आर आर आबा आता तरी थांबा ना .....का आपल्याच सहकारी मंत्र्यांना असा  त्रास देत आहात???? ....काल म्हणे आपण आपला एक महिन्याचा रुपये ५७ हजार  पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री  साह्यता निधीला दीला .......आबा आपल्याला गरीबांचा कळवळा आहे याचा अर्थ बाकी मंत्र्यांना गरीबांचा कळवळा नाही असा होत नाही...... का उगीच त्यांना अडचणीत आणतात??

दुष्काळग्रस्ता  साठी हे तुमचे सहकारी मंत्री नेहमी पेक्षा कीती जास्त काम सध्या रात्रीचा दीवस करून करत आहेत...याची तुम्हाला कांही कल्पना आहे का?? 

दुष्काळी भागातील जनतेला पिण्या साठी पाण्याचे टँकर्स  पुरवणे, या टँकर्सवाल्या लॉबी  ची त्यांच्या मर्जी प्रमाणे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे , यांची बिले लवकरात लवकर कशी निघतील याची जातीने काळजी घेणे....... त्याना नियंत्रित दराने डीझेल उपलब्ध करून देणे....  त्याच बरोबर दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा डेपो छावण्या उभ्या करणे,  चारा वाहतुकीची ट्रक ने  व्यवस्था करणे, आपल्याच भागात कसा जास्तीतजास्त दुष्काळ आहे याचा मिडीयाला हाताशी धरून प्रचार करत  आपल्या मतदार संघात जास्तीत दुष्काळग्रस्त निधी मंजूर करून घेणे..............वेळ प्रसंगी इतर भागातील दुष्काळ निधी आपल्या मर्जीतल्या भागात पळवून आणणे...... ही सर्व जनसेवे ची कामे करत असतानाच आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची सुद्धा नजरेत न येता  व्यवस्था  करणे… इत्यादी जास्तीची कामे सध्या मंत्र्याना , आमदार , खासदाराना करावी लागत आहेत......

प्राचीन काळी भगीरथाने स्वर्गातून  गंगा पृथ्वी वर आणली असे म्हणतात....... स्वर्गा मधुन   पृथ्वी वर गंगा आणणे फार सोप्पे काम होते...... आजच्या सारखे अडथळे नव्हते...... गंगा स्वर्गातून सरळ पृथ्वी वर आली........आज या आधुनिक लोकशाही भगीरथाना पाणी वेगवेगळ्या भागात वळते करण्यासाठी जे अडथळे पार पडावे लागतात, सिंचन घोटाळे (माफ करा प्रकल्प… सध्या सिंचन टाईप केले की  आपोआप घोटाळे हा शब्द येतो त्याला नाईलाज आहे.)...करावे लागतात ते त्यांनाच माहित......आता तर भारतीय रेल्वे च्या वाघिणी ने पाणी पुरवठा करण्याच्या योजना आखण्यात येत आहे. या वाघिणी मिळविण्या करता काय काय अडचणी येतात हे केळी , कांदा उत्पादक शेतकर्याना चांगल्याच माहीत आहे .. या वाघिणी येई पर्यंत कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो आणि केळीच्या बागा शेतातच सुकून जातात..  त्या मुळे रेल्वे ने पाणी दुष्काळी भागात पुरविणार म्हटल्यावर त्यांनी जिवंत राहण्याची आशाच सोडली ...  असे अडथळे त्या भगीरथाला आले असते तर त्याने गंगा पृथ्वी वर आणण्याचा नादच सोडला असता.... असो .
 
खरे तर या जनसेवकाना  या दुष्काळाच्या ज्यादा, अतिरिक्त कामा बद्दल ज्यादा पगार, ओव्हर टाईम , विशेष भत्ता देण्याची गरज असताना, आपण मंत्रिमंडळा च्या बैठकीत  या राज्यकर्त्यांनाच त्यांनी आपआपला दोन महिन्याच्या  पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची मागणी केली… ये बहोत नाइंसाफी झाली आहे.......तरी बर आपल्या सहकारी मंत्र्यांनी आभाळच फाटलं तर आपण कोठे कोठे ठिगळ जोडणार अस म्हणत वेळीच विरोध केला........ आणि पगार न देण्याचा निर्णय घेतला..... पण आपण गप्प न बसता स्वतःचा एकट्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला लगेच ड्राफ्ट काढून दिला. माननीय दादा म्हणतात ते खर आहे......आबांना प्रसिद्धीचे तंत्र चांगलेच अवगत आहे आणि आबा त्याचा उपयोग आपल्या प्रसिद्धी साठी चांगला करून घेतात .....पण आबा आपल्या प्रसिद्धी बरोबर आपल्या बाकीच्या सहकारी मंत्र्याची का अडचण करतात हे बर नव्ह ...
म्हणून  अऱ अऱ  आर आर आबा आता तरी थांबा ना असा अख्ख मंत्रिमंडळ म्हणत आहे. अश्या घटनान मुळेच  या जगण्यावर शतदा प्रेम करावे
.....

No comments: