Translate

Wednesday, February 13, 2013

महाराष्ट्र शासन दुष्काळी पर्यटन........

Prabodh Apegaonkar यांची दुष्काळी पर्यटन या कल्पने ची महाराष्ट्र शासनाने त्वरीत अंमलबजावणी करण्याची योजना आखली असून या पर्यटना मुळे शहरी भागातील जनतेला, विद्यार्थ्यांना दुष्काळ म्हणजे काय ?? पाणी टंचाई , चारा टंचाई, अन्नधान्याची टंचाई याची माहीती होईल, आणि या पर्यटकां मुळे दुष्काळग्रस्त खेड्यातील उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी , उप मुख्यमंत्र्यांनी आणि पर्यटन मंत्र्यांनी पत्रकार परीषदेत जाहीर केला . दुष्काळाच्या संकटा वर दुष्काळी पर्यटनाच्या निमित्ताने खेड्या पाड्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊन या निसर्ग निर्मित संकटावर मात करण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगावी असे आवाहन या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.
या नुसार कृती आराखडा केला असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त दुष्काळग्रस्त गावांची यादी पाठवण्याची आज्ञा करण्यात आली....... या निमित्ताने आपलेच गाव जास्तीत जास्त दुष्काळग्रस्त आहे याची यादीत नोंद करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नेत्यांनी नेहमी प्रमाणे बाजी मारली असून मराठवाडा आणि विदर्भावर नेहमी प्रमाणे हात चोळत बसण्याची वेळ आली आहे...... अधिक माहीती साठी पाहत रहा महाराष्ट्रीय ओसाडगाव च्या दुष्काळी बातम्या..........

No comments: