Translate

Thursday, December 29, 2011

मुहं मे महाराज और बगल मे मदिरा मदिराक्षी.

शिवसेना नेत्याच्या पत्नीच्या बारवर पोलिसांचा छापा. येथे देहविक्रयाचा व्यवसाय चालतो अशी खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून नऊ मुलींची सुटका केली. त्यातील दोन मुली अल्पवयीन आहेत..........उठता बसता शिवाजी महाराजांचे आणि मराठी माणसाचे नाव घेणाऱ्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे मुंबईत बार आहेत .........पण तेथे हे धंदे सुद्धा चालतात आश्‍चर्य आहे.  बारचा परवाना माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या नावे आहे.  तसे कदम यांनी मान्य केले आहे. मुहं मे महाराज और बगल मे मदिरा मदिराक्षी. महाराज आम्हाला माफ करा.
मुंबईतील अनेक बार नेत्यांच्या नातेवाईकांच्या नावे आहेत. काही बारमध्ये त्यांची बेनामी पार्टनरशिप आहे. अंधेरीतील एका बारमध्ये काँग्रेस नेत्याची पार्टनरशिप असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सांताक्रुझमध्ये संगीत बारवर कारवाई झाली होती, तो निहार ठाकरे यांच्या मालकीचा आहे. JAY HO !! JAY MAHARASHTRA !! JAY SHIVAJI !!

No comments: