९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ पावले चालत आईच्या नावे जोगवा मागून आणि दशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या वृक्षाची पूजा करत. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पौराणिक काळापासून प्रचारात असलेली परंपरा पाळून दसरा व्ययक्तिक पातळीवर साजरा केला जात असे.......................
उपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.
दशमीच्या दिवशी मुले वह्या पुस्तकांची पूजा करत. याचा दिवशी शेतकरी धान्याची , शेती अवजारांची पूजा करत तर ज्यांच्या कडे वारसाहक्काने आलेली शस्त्रे बंदूक,तलवारी असत ते शस्त्र पूजन करत. असा साधा घरगुती हा उत्सव होता. म्हैसूर चा राजेशाही उत्सव, बंगालमधील उत्सवांचा उत्सव म्हणजे दुर्गापूजा आणि गुजरातने नवरात्राला घट माथ्यावर घेऊन मुली गाणी गात गात घरोघर जात असत. हे फक्त ऐकून होते.या उत्सवाला आजच्या सारखे बाजारू स्वरूप आले नव्हते.
TV आला आणि हा नऊ दीवस चालणारा घरगुती उत्सव सार्वजनिक होवून त्याचे रुपांतर व्यवसायात धंद्यात झाले. आणि मग गुजराथचा दांडियाने भारतभरच्या तरुणाईला कधी झपाटले हे समजलेच नाही.त्याच बरोबर बंगाल मधील सार्वजनिक दुर्गापूजा सारख्या भारतभर मोठमोठ्या दुर्गा मुर्ती गणपतीच्या मुर्ती सारख्या मंबई पासून खेडोपाडी च्या चोंका चोंकात बसवल्या जावू लागल्या. गणपती झाले की पैसा कमावण्याचे नवे साधन निर्माण झाल्या मुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घरगुती वस्तू पासून गुटका सिगारेट च्या जाहिरातीचे फलक लावत धंदा वाढवण्याची संधी साधली.
त्याच बरोबर देवीच्या मूर्ती मागील मंडपात गणपती प्रमाणेच पत्त्यांचे डाव रंगू लागले. ऐच्छिक असलेल्या वर्गणीचे सक्तीचा खंडणीत कधी रुपांतर झाले हे समजलेच नाही. या सक्तीच्या वर्गणी मुळे समाज नाराज झाला पण सगळ्या संवेदना बधिर झाल्यात "तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करायचा" अजुन काय?..... असा विचार करत तो गप्प रहाणे पसंद करू लागला. हजारो लाखो पासून करोडो पर्यंत ही उलाढाल पोहोंचली , आणि हे पाहून राजकारण्यांनी यात उडी घेतली . गावोगावचे आमदार नगरसेवकांनी सुद्धा देवी मंडळ सुरु केलीत. मग गणपतीच्या उंच मूर्ती प्रमाणे देवीच्या सुद्धा मोठमोठ्या मुरत्या उभ्या राहू लागल्या. देवी समोरील सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चा वादविवाद स्पर्धा कधीच बाद झाल्यात . त्यांची जागा हीन पातळीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमात झाली. देवीच्या समोर मनोरंजनाच्या नावा खाली बाजारू फिल्मी तारे-तारिका विक्षिप्त गाणी म्हणत अंग वेडे वाकडे करत नाचू लागली. या सर्व प्रकाराला विरोध नाही,पण कोणत्या ठिकाणी काय करावे याचे सामाजिक भान उरले नाही .ही खंत सर्वांनाच आहे.
सार्वजनिक मोकळ्या जागा कमी आणि उत्सवी मंडळे मोठ्या प्रमाणात . या मुळे मग हा १० दिवसाचा उत्सव बेकायदेशीर पणे रस्ता बंद करून राजरोस विजेच्या तारेवर आकडे टाकून बेकायदेशीर पणे वीज चोरून लाईट च्या प्रकाशात वेळेचे बंधन न पाळता मध्य रात्री पर्यंत चालू लागला . धर्माच्या नावा खाली चाललेल्या पैश्याच्या खंडणी पासून ते साजरा करण्याची सर्वच बेकायदेशीर कृत्ये प्रशासन हताशपणे पाहत बसण्या पेक्षा कांहींच करू शकत नव्हता.
या सर्व गोंधळात समाजसेवक, विचारवंत मात्र दांडिया उत्सव नंतर ३-४ महिन्यांनी वयस्कर स्त्रीयांच्या , अल्पवयीन मुलींच्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे होणाऱ्या गर्भपाता मुळे चिंतित होवू लागले पण गरबा रास दांडियाच्या ढोलताश्याच्या आवाजात हा क्षीण आवाज आवाज दबून गेला. गणेश उत्सवात फक्त पर्यावरणाचे तीन तेरा वाजत होते.पण या गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही. उपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.
1 comment:
नमस्कार,
आपला ब्लॉग http://www.mogaraafulalaa.com/2010/04/marathi-bloggers-3.html या लिंकवर जोडला गेलेला आहे.
धन्यवाद.
Post a Comment