Translate

Friday, October 15, 2010

भिंतीना कान असतात . तसे माईक ला आवाजा बरोबर कान ही

राष्ट्रकुल स्पर्धा समाप्त होण्याच्या अखेरच्या दिवशी TV वाहिन्यांनी स्पर्धे दरम्यान स्वीकारलेली आचार संहिता ही समाप्त झाली . आणि ही खतम करण्यास आम्हीच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले असा गोबेल्स ला ही लाजवेल असा खोटा प्रचार करून सत्ता राबवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र पक्षाध्यक्ष खुद्द कारणीभूत ठरले. कालचा दांडी यात्रा ते मेवाग्राम हा TV वाहिन्यांवरील तमाशा पहिल्या वर कांही खालील भारतीय म्हणी आठवल्या . आपणास अजून कांही आठवत असतील तर त्या लिहाव्यात .
१) तळे राखील तो पाणी चाखील
२) भिंतीना कान असतात . तसे माईक ला आवाजा बरोबर कान ही असतात (नवी म्हण) Sevagram near Wardha


३) हमाम में सब नंगे होते है. ४) आवो चोरो लुटो सारा , आधा तुम्हारा आधा हमारा ( हायकमांड का)
५) अंधारात केले पण उजेडात आले.
६) अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
७) असतील शिते तर जमतील भूते.
८)ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
९) एक यात्रा बारा भानगडी.
१०) उचलली जीभ लावली टाळ्याला.
११)अती तिथं माती.
१२) आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून. (भाजपा.) तत्वनिष्ठ पक्ष चूक भूल देणे घेणे
१३) शब्दांसारख शस्त्र नाही, त्यांचा वापर जपुनच करावा.
१४) अपापाचा माल गपापा.
१५) कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे आणि अखेर सख्या रे घायाळ मी हरिणी...... कोण ?
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: