Translate

Saturday, October 9, 2010

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती
आपला नम्र
अ ब क
एकेकाळी भारताच्या टपाल खात्याचे अभिन्न अंग असलेल्या पोस्ट कार्ड चे स्थान भारतीय कुटुंबात अनन्य साधारण होते
जिव्हाळ्याचे होते. ......READ MORE....http://www.thanthanpal.blogspot.com


आमच्या लहानपणी टपाल सकाळी ९ वाजता आणि दुपारी २.३० असे दोन वेळेस वाटप होत होते. पोस्टमन येवून गेल्यावरच दुकानदारांची कामे सुरु होत. त्याच बरोबर त्या काळी नातेवाईक , पाहुणे यांची ख्याली खुशाली प्राप्त होण्याचा १५ पैश्याचे कार्ड हाच सर्वात स्वस्त ,मस्त आणि विश्वासार्थ पर्याय होता. तार हा संदेश वाहनाचा शीघ्र प्रकार पण तार आली की काळजाचा ठोका चुकायचं. कारण तार बहुतेक कोणीतरी मयत झाले किंवा गंभीर आजारी आहे असे संदेश घेवूनच येत असे. टेलिफोन हा प्रकार फक्त ठराविक लोकान कडेच होता, आणि फोन लागणे हा अजून एक अवघड प्रकार होता. फोन मध्ये बोलण्याच्या आवाजा इतरच चित्रविचित्र आवाजच जास्त येत. त्याकाळी त्वरित फोन लावायचा असेल तर लाईटनिंग हा प्रकार होता. हा कॉल लावला तर फोन चटकन मिळे पण चार्जेस प्रचंड असत. टेलिफोन ऑपरेटरला जास्त भाव होता . कारण फोन लावणे न लावणे हे याच्याच हाती असे. सायंकाळी ७ वाजता सामान्य जनतेला बाहेरगावी काल लावणे अवघड होते .कारण या वेळी संपूर्ण फोन खाते रतन खत्रीच्या मटका आकडे संपूर्ण भारतात पासून ते पाक श्रीलंका ईतर आशियायी देशात पोहचवण्याचे काम इमानेइतबारे करण्यात मग्न असे. कारण लाखो मटका खेळणाऱ्याच्या नशिबाचा हार-जीत चा फैसला ठरत असे. १९८२ साली माझ्या गावापासून जवळ असलेल्या परळी सोलापूर रस्त्यावर आमच्या गाडीला अपघात झाला .तेंव्हा अपघाताची कल्पना देण्यास घरी लाईटनिंग फोन लावण्यास रुपये २००/- सरकारी बिल अधिक टेलिफोन ऑपरेटरचे फोन लावून देण्याचे रुपये २००/- असे ऐकून रुपये ४००/- लागले. न देवून काय करता अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी त्या वेळी आमची अवस्था झाली होती.
आणि आज तोच निरोप फक्त .६० पैश्यात पोहोचतो. फोन क्रांतीची ही कमाल.सर्व वस्तू अनेक पटीने वाढल्या असताना संदेश वहन पैश्यात होत आहे. याचा सर्वात मोठा फटका पोस्ट कार्यालयाला बसला. पोस्ट कार्डाचा खप एकदम कमी झाला. दुसरी कडे सरकार दरबारी बेकायदेशीर असणाऱ्या कुरिअर कंपन्यांनी पाकीट, महत्वाची कागद पत्रे याचा धंदा हडप केला. या मुळे पोस्ट कार्यालयाचे कंबरडे मोडले आहे. अत्याधुनिक टेलिफोन यंत्राने टेलिफोन ऑपरेटरला चे महत्व कमी झाले. आणि तार टेलिग्राम तर बंद मध्येच जमा आहे. लोक पूर्वी सारखे पोस्टमन ची वाट बघत बसत नाही. मोबाईल मुळे तर लैंड लाईन चा सुद्धा जमाना संपला. हे सर्व आठवण्याचे कारण आज जागतिक पोस्ट ऑफिस दीवस जगभरात साजरा केला जातो. ९ ऑक्टोबर १८७४ ला बर्न या स्विस देशाच्या राजधानीत जगातील सर्व पोस्ट मुख्याधिकाऱ्यांची बैठक भरली होती त्यावेळी हा दीवस साजरा करण्याचा निर्णय झाला. आज जगातील १५० पेक्षा जास्त देशात हा दीवस साजरा केला जातो. पण पत्र लिहिण्याची ती सांभाळून ठेवण्याची परतपरत वाचण्याची जी मजा होती ती आजच्या मोबाईल संवादात नाही . ७०व्या दशकात होणाऱ्या पत्नीला मी  लिहिलेली आणि तिने उत्तर दिलेली पत्रे वाचण्याचा आनंद कांही वेगळाच ,पण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट, भावूक, प्रेम पत्रा बद्दल.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: